भारतीय पदार्थांमध्ये मसाल्यांना फार महत्व आहे. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे हींग. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात हिंग खाल्ल्याने वेगवेगळ्या आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. पण हिंगात असं काय असतं की, याचे इतके फायदे होतात. डाएट एक्सपर्टनुसार, हिंगात बॅक्टेरिया मारण्याची क्षमता असते. पावसाळ्यात अनेक आजारं हे बॅक्टेरियामुळेच होतात. चला तर जाणून घेऊ हिंगाचे फायदे...
त्वचेसाठीही रामबाण
(Image Credit : www.charlottetilbury.com)
पावसाळ्यात त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. खाज, खरूज अशा अनेक समस्या पावसाळ्यात होतात. अशात पदार्थांमध्ये हिंग टाकल्यास तुम्हाला फायदा मिळू शकतो. त्वचेवर कुठेही खाज येत असेल तर पाण्यात थोडा हिंग मिश्रित करून त्या भागावर लावा. याने बॅक्टेरिया नष्ट होती आणि तुम्हाला आराम मिळेल.
डायबिटीस रूग्णांसाठीही फायदेशीर
(Image Credit : theconversation.com)
मधुमेह म्हणजेच डायबिटीस झाला असेल तर खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष द्यावं लागतं. पावसाळ्यात डायबिटीसच्या रूग्णांना इंफ्केशनचा धोका अधिक राहतो. अशात हिंगाचं वेगवेगळ्या पदार्थांमधून हिंगाचं सेवन केलं तर तुम्हाला त्रास होणार नाही.
किडनीच्या आजारापासून बचाव
(Image Credit : news-medical.net)
किडनीच्या आजारांची भीती प्रत्येकालाच असते. अशात तुम्ही जर तुमच्या रोजच्या आहारात हिंगाचा योग्य वापर केला तर तुम्हाला किडनीचे आजार होणार नाहीत. हिंग शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो.
दाताचं दुखणं होईल दूर
(Image Credit : www.hawaiidentalserviceblog.com)
अनेकदा दात दुखण्याचं कारणंच समोर येत नाही. जर तुम्हालाही दात दुखण्याची समस्या असेल तर तुम्हीही हिंगाचं सेवन करू शकता. यासाठी कोमट पाण्यात थोडा हिंग टाकून दोन ते तीन वेळा गुरळा करा. दाताचं दुखणंही दूर होईल आणि तोंडातील सर्व बॅक्टेरियाही नष्ट होतील.