Curd Eating Tips : दही हा एक असा पदार्थ आहे जो जास्तीत जास्त लोक रोज खातात. दद्याचं लोक वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करतात. लहान मुलांना सुद्धा दही खाणं आवडतं. दह्यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन आणि प्रोबायोटिक्ससारखे पोषक तत्व असतात जे पचन तंत्र हेल्दी ठेवतात आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, दह्यासोबत काही गोष्टींचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात दह्यासोबत काय खाऊ नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दह्यासोबत काय खाऊ नये?
1) दही आणि मासे
दही आणि मासे एकत्र खाणं आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. दही आणि मासे दोन्हींचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. दही थंड असतं तर मासे गरम असतात. दोन्ही सोबत खाल तर शरीराचं संतुलन बिघडतं. पचनासंबंधी, त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात.
2) दही आणि आंबट फळं
दह्यात आंबट फळं जसे की, संत्री, लिंबू किंवा इतर सायट्रस फळांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. दही आधीच जरा आंबट असतं आणि त्यात आणखी आंबट मिक्स केलं तर याने अॅसिडिटी वाढते. यामुळे पचनासंबंधी, अॅसिडिटी आणि पोटात गॅस होण्याच्या समस्या होतात.
3) दही आणि दूध
दही आणि दूध दोन्हींमध्ये पोषक तत्व भरपूर असतात. पण यांचं एकत्र सेवन करणं चुकीचं मानलं जातं. दही आणि दुधाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. दोन्ही गोष्टी मिक्स केल्या तर अपचन, गॅस आणि पचनासंबंधी इतरही समस्या होऊ शकतात. आयुर्वेदात दोन्हींना विरूद्ध आहार मानलं जातं.
दही सेवन करण्याची योग्य पद्धत
दह्याचं सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून त्याचे पूर्ण फायदे शरीराला मिळावे. दह्यात काहीच मिक्स न करता खाणं अधिक चांगलं मानलं जातं. दह्यात तुम्ही काही गोड फळं मिक्स करून खाऊ शकता. जसे की, केळी आणि द्राक्ष. दही सामान्यपणे जेवणासोबत किंवा जेवणानंतर खावं याने पचन होण्यास मदत मिळते. तसेच आयुर्वेदानुसार, रात्रीच्या दह्याचं सेवन अजिबात करू नये. कारण याने कफ होण्याचा धोका असतो. तसेच अपचनही होऊ शकतं.
दही एक पौष्टिक आहार आहे. पण याचं सेवन योग्य पद्धतीने केलं जावं. काही पदार्थांसोबत याचं सेवन नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे दह्याचं सेवन करताना वरील गोष्टींची काळजी घ्यावी.