हिवाळा आला की, गुलाबी थंडीसोबतच चाहूल लागते ती म्हणजे गोड गाजराच्या हलव्याची. हिवाळ्यामध्ये बाजारात मुबलक प्रमाणात गाजरं आढळून येतात. गाजराचा हलवा म्हटलं की, तोंडाला पाणी सुटतं. याव्यतिरिक्त मूगाच्या डाळीचा आणि दुधी भोपळ्याचा हलवाही अनेकांना आवडतो. परंतु तुम्ही कधी बटाट्याचा, हळदीचा किंवा टॉमेटोचा हलवा खाल्ला आहे का? ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरिही हे खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असतात. या पदार्थांची रेसिपी माहिती झाल्यानंतर तुम्ही एकदा तरी हा पदार्थ नक्की ट्राय करा. एकदा चाखल्यानंतर तुमच्या फेवरेट पदार्थांच्या लिस्टमध्ये या हटके स्टाइल हलव्यांचा नक्की समावेश कराल. जाणून घेऊया हटके अशा 10 अतरंगी हलव्यांच्या रेसिपीबाबत. तुम्हीदेखील या रेसिपी नोट करा आणि हिवाळ्यात नक्की ट्राय करा.
1. बटाट्याचा हलवा
कोणतीही भाजी तयार करताना अवश्य वापरण्यात येणारा बटाटा, हलवा तयार करण्यासाठीही वापरण्यात येतो. हा तयार करण्यासाठी कमी साखरेचा वापर करण्यात येतो. कारण बटाट्यामध्ये आधीपासूनच साखर असते. यामध्ये दूध आणि तूपाचा वापर करून हा हलवा तयार करण्यात येतो.
2. हरभऱ्याचा हलवा
हिवाळा म्हटलं की शेतातील हिरवेगार, गोडसर हरभरे बाजारात विक्रीसाठी येतात. बहुतांश वेळा कच्चे किंवा तव्यावर भाजून खाल्ल्या जाणाऱ्या या हरभऱ्यांचा चविष्ट आणि पौष्टिक हलवाही तयार करता येतो. हा हलवा तयार करण्याची रेसिपी अगदी तंतोतंत गाजराच्या रेसिपीप्रमाणे असते. यामध्ये दूध, खवा, साखर, ड्रायफ्रुट्स यांसारखे पदार्थ हा हलवा तयार करण्यासाठी वापरले जातात.
3. कच्च्या हळदीचा हलवा
कच्ची हळद व्यवस्थित धुवून घ्या आणि किसणीच्या मदतीने किसून घ्या. यामध्ये पिठ, तूप, दूध आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करा. टेस्टी आणि पौष्टीक कच्च्या हळदीचा हलवा तयार होईल. कच्ची हळद गरोदर महिलांसाठी फायदेशीर ठरतो. याव्यतिरिक्त सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या लोकांसाठीही हा हलवा उपयोगी ठरतो.
4. टॉमेटोचा हलवा
आता तुम्ही विचारात पडला असाल की, टॉमेटो तर आंबट असतात. तर त्याचा हलवा कसा तयार केला जाऊ शकतो. पण दक्षिण भारतामध्ये टॉमेटोचा हलवा सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. हा हलवा तयार करण्यासाठी टॉमेटो, तूप, साखर आणि ड्रायफ्रुट्सचा वापर करा.
5. कांद्याचा हलवा
कांद्याचा हलवा हिवाळ्यामध्ये आरोग्य चांगलं राखण्यासाठी फायदेशीर ठरतो. हिवाळ्यात उद्भवणाऱ्या तब्येतीच्या तक्रारींशी लढण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हा हलवा उपयोगी ठरतो. हा हलवा तयार करण्यासाठी तूप आणि भाजलेल्या काजूंचा वापर करण्यात येतो. काजूमुळे कांद्याचा उग्र वास आणि कडवटपणा नष्ट होण्यास मदत होते.
6. काळ्या गाजराचा हलवा
लाल गाजर तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पण हिवाळ्यामध्ये काळ्या गाजराचा हलवा नक्की ट्राय करा. हिवाळ्यात तुम्हाला बाजारामध्ये लाल गाजर मुबलक प्रमाणात आढळून येते. परंतु काळं गाजर काही वेळासाठीच बाजारात उपलब्ध होतं. हा हलवा तयार करण्यासाठी लाल गाजराचीच रेसिपी फॉलो करा.
7. कच्च्या केळांचा हलवा
जर तुम्हाला केळी आवडत असतील तर तुम्ही एकदा तरी कच्च्या केळांचा हलवा ट्राय करणं गरजेचं आहे. हा हलवा तयार करताना साखरेचा वापर कमी करण्यात येतो कारण केळ्यमध्ये आधीपासूनचं साखरेचे प्रमाण अधिक असतं. यामध्ये तूप आणि ड्रायफ्रुट्स वापरणं फायदेशीर ठरतं.
8. बीटाचा हलवा
बीटाचा हलवा आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल, हा हलवा तयार करण्यासाठी खवा, दूध आणि ड्रायफ्रुट्सचा वापर करा. बीटामध्येही साखर असते. त्यामुळे साखर कमी वापरण्यात येते. काही ठिकाणी साखरेचा वापर न करताच बीटाचा हलवा तयार करण्यात येतो.