अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, महिला आणि पुरूषाच्या शारीरिक रचनेत फरक असतोच पण त्याचबरोबर मेटाबॉलिक फरकही असतात. महिलांचं शरीर पुरूषांपेक्षा वेगळं असतं. त्यामुळेच त्यांच्या आहाराच्या गरजाही पुरूषांपेक्षा वेगळ्या असतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असे 8 पदार्थ ज्यांचा प्रत्येक महिलेला आपल्या डाएटमध्ये समावेश करणं अत्यंत आवश्यक असतं. ज्यामुळे त्यांना नेहमीच फिट आणि हेल्दी राहण्यास मदत होते.
दूध
जगभरामधील महिलांमध्ये आढळून येणारी समस्या म्हणजे, कॅल्शिअमची कमतरता. खरं तर महिलांनी वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या आहारामध्ये दूधाचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. दूधामध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतं. एवढचं नाही तर PMSची लक्षणं कमी करण्यासाठीही दूध फायदेशीर ठरतं.
टॉमेटो
टॉमटोमध्ये आढळून येणारं लायकोपीन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. अनेक रिसर्च आणि संशोधनांमधून हे सिद्ध झालं आहे की, टॉमेटो ब्रेस्ट कॅन्सरपासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरतं. सध्या ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये वेगाने पसरणारा आजार आहे. पण ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर टॉमेटो खाणं सुरू करा. याव्यतिरिक्त टॉमेटो हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतं.
ओट्स
मुबलक पोषक तत्व असलेले ओट्स महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर समजले जातात. ओट्स डायजेशनसाठी उत्तम ठरतं. तसेच तुमचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ओट्स मदत करतात. ओट्समध्ये व्हिटॅमिन बी6 देखील असतं, जे मासिक पाळीदरम्यान होणारे मूड स्विंग्स आणि PMS ची लक्षणं दूर करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर ओट्समध्ये फॉलिक अॅसिड असतं, जे गरोदरपणात अत्यंत फायदेशीर ठरतं.
पालक
हिरव्या पालेभाज्यांचा विषय निघताच सर्वात पहिलं नाव घेण्यात येतं ते पालकचं. अनेक लोकं पालकपासून दूर पळतात. पण तुम्हाला माहीत आहे का? व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि मॅग्नेशियम यांसारखी अनेक पोषक तत्व पालकमध्ये असतात. मासिक पाळी दरम्यान शरीरामध्ये होणारे बदल किंवा शारीरिक लक्षणं म्हणजेच, सूज, ब्रेस्ट-टेंडरनेस, ब्लोटिंग आणि वेट गेन यांसारख्या समस्यांवर परिणामकारक ठरतं.
अक्रोड
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, अॅन्टीऑक्सिडंट आणि फायटोस्टेरॉल आढळून येतं असून ही तीनही पोषक तत्व ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात. ओमेगा-3 मुबलक प्रमाणात असल्यामुळे हाडांचे आरोग्य, आर्थरायटिस आणि डिप्रेशन दूर करण्यासाठी मदत करतात.