(Image Credit : monatomic-orme.com)
आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग म्हणजे, आपला मेंदू. आपल्या शरीराचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी त्याला सुचना देण्याचं काम मेंदू करत असतो. त्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मेंदूचं आरोग्य उत्तम असणं अत्यंत आवश्यक असतं. जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल आणि त्याचबरोबर मेंदूचं आरोग्य उत्तम राखायचं असेल तर तुमच्या डाएटकडे जरा लक्षं देणं आवश्यक असतं.
काही पदार्थ असे असतात जे मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यामध्ये खासकरून बियांचा समावेश होत असतो. या बियांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असतात. एवढचं नाही तर या बियांमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट्सही असतात. त्यामुळे या बियांचं सेवन करणं मेंदूसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. अनेक बिया प्रोटीन, मिनरल्स आणि झिंकचे उत्तम स्त्रोत मानले जातात. ज्या फक्त आरोग्यासाठीच नाहीतर स्मरणशक्ती वाढविण्यासाठीही मदत करतात. जाणून घेऊया मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी आहारात कोणत्या बियांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं त्याबाबत...
सब्जाच्या बिया
मेंदूचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी सब्जाच्या बिया फायदेशीर समजल्या जातात. सब्जामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतं, जे मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासोबतच हानिकारक तत्वांपासून मेंदूचा बचाव करतात.
भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशिअम, आयर्न, झिंक आणि कॉपर यांसारखी पोष क तत्व असतात. ज्या मेंदूसाठी अत्यंत आवश्यक ठरतात. यामध्ये अनेक प्रकारचे अॅन्टी-ऑक्सिडंट्स असतात. जे मेंदू हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात. असातच भोपळ्याच्या बियांचं सेवन नक्की करा. खासकरून मुलांच्या आहारात यांचा नक्की समावेश करा.
तिळाच्या बिया
तिळाच्या बियांमध्ये लिपोफिलिक अॅन्टी-ऑक्सिडंट्स असतात. जे मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी लाभदायक असतात. ब्रेन डॅमेजसोबतच वाढत्या वयामध्ये उद्भवणाऱ्या मेंदूच्या समस्या म्हणजेच, अल्झायमर, मेमरी लॉस यांसारख्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात.
सुर्यफुलाच्या बिया
सुर्यफुलाच्या बियांमध्ये मेंदूसाठी लाभदायक ठरणारं ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असतात. जे मेंदूचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यामुळेचे सुर्यफुलाच्या बियांचं सेवन करणं मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.