सध्या जगभरात अनेक संसर्गजन्य रोग थैमान घातल असून त्यामागील अनेक कारणांपैकी अनियमित आहार आणि जीवनशैली ही प्रमुख कारणं असल्याचे सांगितलं जातं. डायबिटीस, हार्ट डिजिज, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा या सर्व चुकीच्या आहारशैलीमुळे होणाऱ्या समस्या आहेत. अशातच आम्ही एक हेल्दी डाएटचा ऑप्शन स्विकारून लाइफस्टाइलशी निगडीत अनेक आरोग्याच्या समस्या कमी करू शकतो. 16 ऑक्टोबर जगभरात वर्ल्ड फूड डे म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने आज आम्ही सांगणार आहोत की, तुमचं जेवणाचं ताट तुम्ही कसं परिपूर्ण करू शकता त्याबाबत...
यूनायटेड नेशन्सची संस्था FAO फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायजेशनने वर्ल्ड फूड डे चं औचित्य साधून काही टिप्स शेअर केल्या आहेत. आपल्या डाएटमध्ये काही बदल करून तुम्ही आजारांपासून दूर राहून स्वतःला हेल्दी अन् फिट ठेवू शकता.
घरी तयार केलेल्या जेवणाला द्या प्राधान्य...
जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत घरी तयार केलेल्या पदार्थांचं सेवन करा. जर तुम्ही तुमचं जेवण स्वतः तयार करणार असाल तर ते पदार्थ हेल्दी असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये प्रिजर्वेटिव्स असू नये, त्यामध्ये समावेश करण्यात आलेले सर्व पदार्थ फ्रेश असावेत. तसेच तेलही कमी असावं.
फळं आणि भाज्या खा
आपल्या दररोजच्या डाएटमध्ये फास्ट फूड, पॅकेज्ड फूड आणि प्रोसेस्ड फूड ऐवजी जसं शक्य असेल तसं ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश करा. डाळी खा, नट्स आणि ड्राय फ्रुट्स खा. या सर्वांमध्ये आवश्यक न्यूट्रिएंट्स असतात जे तुम्हाला हेल्दी करण्यासाठी मदत करतात.
फूड लेबल वाचा
खाण्या-पिण्याच्या कोणत्याही वस्तू खरेदी करण्याआधी त्याचं फूड लेबल नक्की तपासून घ्या. तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की, तुम्ही जे पदार्थ खरचं खाणार आहात. त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होणार आहे.
साखर आणि मीठ कमी खा
तुम्ही सर्वांनी एक म्हण ऐकली असेलच, अति तिथे माती... परंतु, साखर, मीठ आणि अनहेल्दी फॅट्स जर तुमच्या डाएटमध्ये जास्त असतील तर आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शक्य असेल तेवढं साखर, मीठ आणि अनहेल्दी फॅट्सचा आहारात कमी समावेश करा. शक्य असेल तर अनसॅच्युरेटेड हेल्दी फॅट्सचा डाएटमध्ये सामावेश करू शकता.
व्हाइट ऐवजी ब्राउन ठरतो उत्तम पर्याय
कोणतीही व्हाइट गोष्ट जास्त रिफाइंड असते. त्यामुळे त्याऐवजी तुम्ही हेल्दी ठरणाऱ्या ब्राउन पदार्थांचा समावेश करू शकता. तुम्ही ब्राउन राइस, ब्राउन शुगर यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
(Image Credit : PureWow)
मुलांचं जेवणाचं ताट असं असावं...
मुलं हेल्दी पदार्थ तेव्हाचं खातत जेव्हा ते त्यांना दिसायला सुंदर दिसतात. याचाच अर्थ तुम्ही त्यांना पदार्थ देताना सुंदर प्लेटमध्ये पदार्थ द्यावेत. अनेकदा असं सांगितलं जातं की मुलांच्या आहारात कलरफुल पदार्थांचा समावेश करावा. त्यामध्ये गाजर, वाटाणे, कोबी, बिन्स, बिट यांसारख्या भाज्यांचा समावेश करावा. तसेच त्यांना दररोज एकाच प्रकारचे पदार्थ देण्याऐवजी जेवणात व्हरायटी ठेवा.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)