हेल्दी राहण्यासाठी आहारामध्ये फळांचा समावेश करा असे आपल्याला नेहमी सांगण्यात येत. परंतु, फळं नेमकी कधी खावीत याबाबत सावधानता राखणं गरजेचं आहे. असे न केल्यानं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. सगळ्या फळांमध्ये मोठया प्रमाणात शरीरासाठी आवश्यक असे पोषक घटक असतात. पण अशीही काही फळं आहेत जी अनोशापोटी खाल्यानं त्यातील पोषक घटक शरीरासाठी हानिकारक ठरतात. गोड फळं जर अनोशापोटी खाल्ली तर शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे मधुमेहाचा धोका संभवतो. जाणून घेऊयात अशा फळांबाबत जी सकाळी अनोशापोटी खाल्यानं शरीराला नुकसान पोहोचवतात.
आंबा
आहारतज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, कधीही रिकाम्या पोटी आंबा खाणं महागात पडू शकतं. आंब्यामध्ये साखरेचं प्रमाण मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे अनोशापोटी आंबा खाल्यानं साखर थेट रक्तात मिसळते.
पेर
पेर या फळामध्ये कच्च्या फायबरचे प्रमाण जास्त असते. रिकाम्यापोटी पेर खाल्यानं पोटातील नाजूक अवयवांवर याचा परिणाम होऊन त्यांना इजा पोहचू शकते. त्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ सकतो.
केळं
केळीचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. परंतु केळी अनोशापोटी खाल्यानं शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. केळ्यामध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण अधिक असते. ते थेट रक्तामध्ये मिसळते. असे होणे हृदयासाठी घातक असते.
द्राक्ष
द्राक्ष एक सायट्रस फळ आहे. यामध्ये अॅसिडची मात्रा अधिक असते. अॅसिड असलेली फळं अधिक प्रमाणात खाल्यानं जठराचा अल्सर आणि पोटात जळजळ सारख्या समस्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटात गॅससारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर हार्ट अटॅकचाही धोका संभवतो.
लिची
लिची हे शरीरासाठी अत्यंत लाभदायक पदार्थ आहे. पण जर याचे सेवन रिकाम्यापोटी केलं तर शरीरातील साखरेचं प्रमाण वाढते. त्यामुळे पोटात गॅसची समस्या वाढते. त्यामुळे पोटात वेदना होऊ शकतात.
टॉमेटो
टॉमेटोमध्ये मोठ्या प्रमाणावर टॅनिक अॅसिड आढळते. रिकाम्या पोटी टॉमोटो खाल्यानं पोटातील आम्लाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पोटात अल्सर होण्याची शक्यता वाढते.