नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं करुन खाण्याचा मूड झाला असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक खास रेसिपी आहे. तुम्ही बनाना पॅनकेक हा पदार्थ ट्राय करु शकता. हा पदार्थ एकदा खाल्यास याची चव तुम्ही विसरणार नाहीत आणि सोबतच हा पदार्थ हेल्दी सुद्धा आहे. हा पदार्थ केवळ तुम्हालाच नाही तर घरातील सर्वांनाच आवडेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. चला जाणून घेऊ हा खास बनाना पॅनकेक तयार करण्याची पद्धत...
साहित्य -
मैदा - १२५ ग्रॅमबेकिंग सोडा - १ चमचामीठ - चिमुटभरकस्टर्ड शुगर - २ चमचेदूध - गरजेनुसारअंडं - १साखर - १२५ ग्रॅमलोणी - १ चमचाकेळी - १ कापलेलीमेपल सिरप किंवा मध - गार्मिशसाठी
कसे कराल तयार?
सर्वातआधी एका बाऊलमध्ये मैदा, बेकिंग पावडर, मीठ आणि कस्टर्ड शुगर मिश्रित करा. आता यात गरजेनुसार दूध, १ अंडं आणि १ चमचा वितळवलेलं लोणी टाकून चांगल्याप्रकारे मिश्रण करा. नंतर यात दूध टाकून हे मिश्रण सॉफ्ट होईपर्यंत चांगलं फेटून घ्या. आता हे मिश्रण थोडं घट्ट होण्यासाठी तसंच ठेवा.
आता एका नॉन स्टीक पॅन घ्या आणि ते लहान आचेवर गरम करुन त्यात लोणी वितळवून घ्या. आता एक चमचा मैद्याचं मिश्रण यात टाकून तोपर्यंत शिजवा जोपर्यंत त्याच्या वरच्या भागावर बुडबुडे येणार नाही. नंतर ते परतवा. पॅन केक दोन्हीकडून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करा. याचप्रकारे सर्व पॅन केक्स तयार करा. हे पॅनकेक फ्रूट, मेपल सिरप किंवा मध गार्निशसोबत सर्व्ह करा.