मॉस्को : सर्व जागाचे लक्ष लागून राहिलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे बिगुल वाजण्यास अवघ्या ८ दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. स्पर्धेविषयी सर्वांची उत्सुकता ताणली असताना, ज्या ११ शहरांतील १२ स्टेडियम्सवर विश्वचषक सामने रंगणार आहेत, त्यांना फिनिशिंग टच देण्यात यजमान सध्या गुंतले आहे.यानिमित्ताने यजमानांच्या या सर्व स्टेडियम्सची थोडक्यात ओळख देत आहोत. रशियातील या सर्व स्टेडियम्सच्या विविधतेबाबत चर्चा केली तर सेंट पीटर्सबर्गमध्ये उन्हाळ्यात कधी-कधी सूर्यास्तच होत नाही, तर कालासागर तटाच्या किनाऱ्यावर असलेल्या सोचीमध्ये उष्णकटिबंधीय वातावरण आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळाडूंचा विविध वातावरणामध्ये खेळताना कस लागेल. यामध्ये लुजन्हिकी स्टेडियममध्ये सर्वात मोठे असून अंडाकृती आकाराचे फिश स्टेडियम सर्वात महागडे आहे.१) लुजन्हिकी स्टेडियमशहर : मॉस्को, क्षमता : ८१००६, बांधकाम खर्च : पुननिर्माण करण्यासाठी ४१ कोटी डॉलर.या स्टेडियमची निर्मिती १९५० मध्ये झाली. विश्वकप स्पर्धेची अंतिम लढत याच स्टेडियममध्ये खेळली जाणार आहे.२) स्पार्टक स्टेडियमशहर : मॉस्को, क्षमता : ४३२९८, बांधकाम खर्च : २५ कोटी डॉलर.या स्टेडियमची निर्मिती २०१४ मध्ये झाली. रशियन प्रीमिअर लीग २०१७ चे चॅम्पियन स्पार्टक मॉस्कोचे हे घरचे मैदान आहे.३) सेंट पीटर्सबर्ग स्टेडियमशहर : सेंट पीटर्सबर्ग, क्षमता : ६८१३४, बांधकाम खर्च : ७३.५ कोटी डॉलरअंतरिक्ष यानाप्रमाणे दिसणाºया या स्टेडियमची निर्मितीसाठी वारंवार उशीर झाल्यामुळे मोठी चर्चा झाली. या स्टेडियमच्या बांधकामादरम्यान आठ मजुरांचा मृत्यू झाला. या स्टेडियममध्ये उपांत्य फेरीची लढत होणार आहे.४) फिश स्टेडियमशहर : सोची, क्षमता :४७,७००, बांधकाम खर्च : सुरुवातीला ४० कोटी डॉलर आणि फुटबॉल सामना खेळविण्याच्या स्तराचे बनविण्यासाठी ६.८ कोटी डॉलर.सोची आॅलिम्पिकमध्ये डोपिंग वादामुळे रशियाची नाचक्की झाली, पण त्यांच्या परंपरेचा हा उत्तम नमुना आहे.५) कजान एरेनाशहर : कजान, क्षमता : ४४७७९, बांधकाम खर्च : २५ कोटी डॉलर.रशियाच्या नव्या पिढीचे फुटबॉल स्टेडियम म्हणून या स्टेडियमचा उल्लेख करता येईल. स्टेडियम्सच्या प्रोटोटाईप म्हणून याचा वापर करण्यात आला.६) समारा एरेनाशहर : समारा, क्षमता : ४४,८०७, बांधकाम खर्च : ३१ कोटी डॉलर.समारा शहरातील वोल्गा नदीच्या तटावर असलेल्या या महत्त्वाच्या स्टेडियमची निर्मितीही महतप्रयासाने वेळेवर पूर्ण झाली. त्याचे घुमट काचेचे आहे. त्यात रशियाच्या अंतरिक्ष कार्यक्रमामध्ये समाराचा इतिहास दाखविण्यात आला आहे.७) निजनी नोवगोरोद स्टेडियमशहर : निजनी नोवगोरोद, क्षमता : ४५,३३१, बांधकाम खर्च : ३०.७ कोटी डॉलर.निजनी नोवगोरोद स्टेडियम येथील बांधकाम शैलीचा एक उत्तम नमुना आहे. या मैदानावर उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल.८) रोस्तोव एरेनाशहर : रोस्तोव-आॅन-डॉन, क्षमता : ४५,१४५, बांधकाम खर्च : ३३ कोटी डॉलर.दक्षिण रशियातील या स्टेडियममध्ये खेळणाºया संघांना उष्णतेचे आव्हान राहील. उष्ण हवामानामध्ये खेळताना खेळाडूंच्या कामगिरीवर परिणामही होईल.९) वोल्गोग्राद एरेनाशहर : वोल्गोग्राद, क्षमता : ४५,५६८, बांधकाम खर्च : ३० कोटी डॉलर.एकेकाळी स्टालिनग्राद नावाने ओळखल्या जाणाºया या शहराप्रमाणे स्टेडियममध्येही युद्धाचा इतिहास दिसतो.१०) एकातेरिनबर्ग एरेनाशहर : येकातेरिनबर्ग, क्षमता : ३५,६९६, बांधकाम खर्च : पुनर्निर्माणसाठी २२ कोटी डॉलर.अस्तित्वात येण्यापूर्वीच युराल पर्वताचे शहर येकातेरिनबर्गचे हे स्टेडियम आपल्या वेगळ्या आकारासाठी प्रसिद्ध आहे.११) मोरदोविया एरेनाशहर : सरांस्क, क्षमता : ४४,४४२, बांधकाम खर्च : २९.५ कोटी डॉलर.केवळ तीन लाख लोकसंख्या असलेल्या या शहराची यजमानपदासाठी निवड होणे आश्चर्यचकित करणारे आहे.१२) कॅलिनइनग्राद स्टेडियमशहर : कॅलिनइनग्राद, क्षमता : ३५,२१२, बांधकाम खर्च : ३० कोटी डॉलर.कॅलिनइनग्राद रशियाच्या उर्वरित भागापासूनवेगळा आहे. हे शहर पोलंड व लिथुआनिया यांच्यादरम्यान आहे.
विश्वकप स्पर्धेचे यजमानपद भूषविणारी १२ स्टेडियम सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 2:05 AM