मेक्सिकन फुटबॉल संघातील खेळाडू अलेक्झांडर मार्टिनेझ ( 16 वर्ष) याची हत्या करण्यात आली. अमेरिका-मेक्सिको यांच्यातील नागरिकत्वाचा वाद सुरू आहे. त्यावरून तेथे बराच वाद सुरू आहे.. स्थानिकांकडून पोलिसांची हत्या करण्यात आली. प्रत्युत्तरात पोलिसांच्या कारवाईत मार्टिनेझची हत्या झाली. गैरसमजातून मार्टिनेझवर गोळी झाडली गेल्याचे पोलिसांनी सांगितले. मार्टिनेझला अखेरचा निरोप देण्यासाठी बरीच लोकं जमली होती. पण, त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला अनोखी श्रद्धांजली वाहिली.
आलिशान रिसॉर्टचा मालक आहे 'हा' क्रिकेटपटू; एका दिवसासाठी मोजावे लागतात 88 हजार !
मार्टिनेझ आणि त्याचे सहकारी जेथे फुटबॉलचा सराव करायचे तेथे त्याची शवपेटी नेण्यात आली. गोलपोस्टच्या समोर ती शवपेटी ठेवण्यात आली आणि सहकाऱ्यांनी एक सामना खेळला. यात त्यांनी मार्टिनेझला अखेरचा गोल करू दिला आणि त्यानंतर सर्व सहकारी त्या शवपेटीवर डोकं ठेवून रडू लागले. हा भावनिक क्षण पाहताना सर्वांचे अश्रू तरळू लागले होते. मार्टिनेझला निरोप देण्यासाठी 300 हून अधिक लोकं उपस्थित होते. त्याच्या अखेरच्या गोलचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
भारतीय क्रिकेट वाटचालीचा साक्षीदार हरपला; माजी खेळाडूनं झोपेतच घेतला अखेरचा श्वास
अम्फान वादळ: दहा हजार कुटुंबीयांच्या मदतीसाठी सौरव गांगुली रस्त्यावर!
ऑस्ट्रेलियातील रस्त्यांवर झळकतायत कोहली, तेंडुलकर यांच्या नावाचे फलक; जाणून घ्या कारण
जादू की भूत? आकाश चोप्रानं शेअर केला भयावह Video; तुम्हालाही बसेल धक्का