कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात लाखो मजूरांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला होता. या काळात घाना देशाचा फुटबॉलपटू 72 दिवस मुंबई विमानतळावर राहिला होता. मुंबईच्या टर्मिनल 2 वर घानाचा फुटबॉलपटू रँडी जुआन मुलर गेले अडीच महिने मुक्काम करावा लागला. समोसे आणि फ्राईड राईस खाऊन त्यानं हे दिवस काढले. पण, आदित्य ठाकरेंनी या फुटबॉलपटूची मदत केली. बुधवारी आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेऊन मुलरची विमानतळावरून वांद्र्यातील हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्षही आहेत.
21 मार्चपासून तो मुंबई विमानतळावर अडकला होता. लॉकडाऊनमुळे त्याला स्वगृही परतता आले नाही. तेथे CIFS, पोलीस आणि सुरक्षा रक्षक व हाऊसकिपींगच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली. पण, त्याच्याजवळील पैसे संपले. नोव्हेंबर 2019मध्ये तो भारतात आला होता. केरळा येथील ORPC स्पोर्ट्स क्लबकडून तो खेळतो.
''सहा महिन्यांच्या व्हिसावर मी येथे आलो होतो. मला प्रत्येक सामन्याला 2 ते 3 हजार रुपये मिळतात. मला फार कमी सामने खेळण्याची संधी मिळाली आणि येथे येण्यासाठी मी 1.5 लाख रुपये खर्च केले. पण, जेव्हा लॉकडाऊनबाबत समजले, तेव्हा मी घरी जाण्याचा निर्णय घेतला. माझ्याकडे 30 मार्चचे मुंबई ते घाना व्हाया केनिया असे प्रवासाचे तिकीट होते. मी मुंबईत आधीच दाखल झालो आणि त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाला व मी येथे अडकलो,'' असे त्याने सांगितले.
अनेक प्रवाशांनी मुलरला पैसे व जेवणाची मदतही केली. मुलरनं याबाबत काही दिवसांपूर्वी ट्विट केलं आणि त्याचं हे ट्विट आदित्य ठाकरेंनी पाहिलं. त्यानंतर युवा सेनाचा नेता राहुल कनाल यांनी मुलरला वांद्रे येथील लकी हॉटेलमध्ये नेले. तेथून त्यानं घाना दुतावासाशी संपर्क केला आणि त्यांनी त्याला घरी सुखरूप पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे.
विराट कोहलीच्या श्रीमंतीचा थाट; आलिशान बंगला पाहून म्हणाल,'वाह क्या बात है!'
Video: 'लाईव्ह मॅच विथ 3D इफेक्ट'; असा सामना कधी पाहिला नसेल, लागली पैज!
वर्णद्वेशाविरुद्धचा लढा तीव्र होतोय; दिग्गज खेळाडूकडून तब्बल 700 कोटींची मदत!
धक्कादायक : कोरोनामुळं महाराष्ट्राच्या माजी फुटबॉलपटूचे निधन
Fact Check : विराट-अनुष्काचा घटस्फोट? सोशल मीडियावर का ट्रेंड होत आहे #VirushkaDivorce?