नवी दिल्ली : अवघ्या काही दिवसानंतर भारतात प्रथमच १७ वर्षांखालील विश्वचषकाचा महासंग्राम सुरू होत आहे. या विश्वचषकाकडे तमाम फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ब-याच गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत, त्यात भारतीय संघाचे प्रशिक्षक लुईस नॉर्टन दि मातोस यांचा उल्लेखही महत्त्वपूर्ण आहे. पोतुर्गालच्या या प्रशिक्षकाचे भारतीय कनेक्शन सध्या चचेर्चा विषय बनला आहे. आपण पोतुर्गाली जरी असलो तर अर्धे भारतीय आहोत, असा खुलासा खुद्द मातोस यांनी केला आहे. भारतात येणे माझ्या नशिबात होते आणि मी येथे आलो. माझे पणजोबा हे भारतीय होते. पोतुर्गालमध्ये ते नेहमी भारताचे गुणगाण गात होते. अशातच भारतीय संघाचा एक भाग बनणे माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. भारतात फुटबॉलच्या एका नव्या पवार्ची सुरुवात होत आहे. त्यातच १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकामुळे ती उंची गाठता येईल.प्रशिक्षक मातोस यांनी संघाच्या प्रदर्शनावर बोलणे टाळले खरे; पण त्यांनी ही स्पर्धा भारतीय फुटबॉलच्या उज्ज्वल भविष्याचे पहिले पाऊल असल्याचे सांगितले. विश्वचषकात ज्या गटात भारताचा संघ आहे त्यात माजी विजेते घाना, कोलंबिया आणि अमेरिका संघाचे तगडे आव्हान असेल. पहिल्याच फेरीतून पुढे जाणे हे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल, असेही ते म्हणाले.संघाच्या तयारीबाबत मातोस म्हणाले, केवळ सात महिन्यांत मजबूत संघ तयार करणे कठीण असते. परंतु, वेळेनुसार जे होईल ते सर्व करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. भारतीय संघाची तुलना दक्षिण अमेरिका आणि युरोपसह इतर संघांसोबत केली तर त्यात फरक असेल. निकाल आणि शक्यता याबाबत मी जास्त विचार करीत नाही. पुढे काय होईल याचा विचार न करता आपल्याला सर्वाेत्तम कसे सिद्ध करता येईल याकडे माझे लक्ष आहे. भारतासाठी हा विश्वचषक महत्त्वपूर्ण आहे; कारण ही भारतीय फुटबॉलसाठी उत्तम सुरुवात आहे. यावर भारताचे बरेच भविष्य अवलंबून आहे. या अनुभवाचा भारताला फायदा उठवता येईल. मला विश्वास वाटतो की, येत्या ८-१० वर्षांत भारतीय फुटबॉलचा स्तर उंचावेल आणि भारताची तुलना इतर संघांसोबत होईल. येत्या ८-१० वर्षांत खेळाडू राष्ट्रीय संघात स्थान मिळवतील. सध्याच्या खेळाडंूवर माझा विश्वास असून प्रदर्शनावर समाधानी आहे.जिंकण्यासाठी सर्व काही...यजमान म्हणून भारतावर दबाव असेल हे निश्चित; पण, आमच्याकडे जिंकण्यासाठी सर्व काही आहे, असे सांगत मातोस म्हणाले, ‘खेळाडूंनी आत्मविश्वासाने खेळावे. आमच्याकडे सर्व काही आहे, हे जर आपण दाखवू शकलो तर तुम्ही मोठे यश मिळवला. संघ समतोल आहे. खेळाडू नव्या उमेदीचे आहेत. विश्वास आणि जिद्दीनेच सर्वांनी मैदानात उतरायला हवे.’हीच संधी.. मातोस म्हणाले, युवा संघात गमावण्यासारखे काहीच नाही. जगाला आपला दम दाखवण्याची हीच संधी आहे. विश्वचषकात भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध होईल. या संघाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही सक्षम असून सज्ज आहोत.’ तसेच, खेळाडूंनी खेळण्याचा आनंद लुटावा असा सल्ला मातोस यांनी भारतीय संघाला दिला आहे.
जन्माने पोर्तुगीज असलो तरी अर्धा भारतीयही आहे - लुईस नॉर्टन दि मातोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:38 AM