ठळक मुद्देआतापर्यंतच्या स्पर्धेत तिच्या नावावर अकरा गोल जमा आहेत. त्यामुळे आशियाई स्पर्धेत सर्वाधिक गोल तिच्या नावावर राहतील, असे म्हटले जात आहे.
जकार्ता : फुटबॉलमध्ये एक गोल झाला तर खेळाडू आनंदाने उड्या मारायला लागतात. कारण फुटबॉलमध्ये एक गोल करणे ही फार मोठी गोष्ट समजली जाते. एका सामन्यात जास्तीत जास्त गोलहॅट्रीक पाहिली असेल. पण आशियाई क्रीडा स्पर्धेत मात्र एका खेळाडूने तब्बल 9 गोल केले आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेत चीन आणि ताजिकीस्तान यांच्यामध्ये महिलांचा फुटबॉलचा सामना होता. या उपांत्य फेरीच्या लढतीत चीनच्या चीनच्या वांग शांशान या खेळाडूने तब्बल 9 गोल केले. आतापर्यंतच्या स्पर्धेत तिच्या नावावर अकरा गोल जमा आहेत. त्यामुळे आशियाई स्पर्धेत सर्वाधिक गोल तिच्या नावावर राहतील, असे म्हटले जात आहे. चीनने हा सामना १६-० ने जिंकला.