या वर्षी चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ साठी भारतीय फुटबॉल संघाची घोषणा करण्यात आली आहे. सुनील छेत्रीसह २२ खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. प्रशिक्षक इगोर स्टीमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघा खेळणार आहे. या वर्षी आतापर्यंत खंडीय आणि सैफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकल्यानंतर आता भारतीय फुटबॉल संघ ९ वर्षांनंतर प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चीनला रवाना होणार आहे.
हँगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय पुरुष आणि महिला फुटबॉल संघांना खेळणे कठीण मानले जात होते. कारण क्रीडा मंत्रालयाने आशिया खंडातील अव्वल- ८ संघच यात सहभागी होऊ शकतात असा नियम केला होता. मात्र, भारतीय फुटबॉल महासंघाच्या आवाहनानंतर मंत्रालयाने नंतर शिथिलता देत भारतीय फुटबॉल संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत जाण्याची परवानगी दिली.
२३ वर्षांखालील खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतात. पण कोरोना व्हायरसमुळे हे गेम्स २०२२ ऐवजी २०२३ मध्ये होणार आहेत. त्यामुळे २४ वर्षांवरील खेळाडूंनाही सूट देण्यात आली आहे. भारताच्या पुरुष संघाला यजमान चीन पीआर, बांगलादेश आणि म्यानमारसह अ गटात स्थान देण्यात आले आहे. यात २३ संघ असून त्यांची सहा गटात विभागणी करण्यात आली आहे. गट अ, ब, क, ई आणि फ मध्ये प्रत्येकी चार संघ आहेत तर गट ड मध्ये तीन संघ आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघ पुढीलप्रमाणे आहे:- गोलरक्षक: गुरप्रीत सिंग संधू, गुरमीत सिंग, धीरज सिंग मोइरांगथेमबचावपटू: संदेश झिंगन, अन्वर अली, नरेंद्र गेहलोत, लालचुंगनुंगा, आकाश मिश्रा, रोशन सिंग, आशिष रायमिडफिल्डर: जॅक्सन सिंग, सुरेश सिंग, अपुईया राल्टे, अमरजीत सिंग, राहुल केपी, नौरेम महेश सिंगफॉरवर्डः शिवशक्ती नारायणन, रहीम अली, अनिकेत जाधव, विक्रम प्रताप सिंग, रोहित दानु, सुनील छेत्रीमुख्य प्रशिक्षक: इगोर स्टीमॅक