बार्सिलोना : लियोनल मेस्सीने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सत्रात मॅँचेस्टर युनायटेडला (एमयू) ३-० असे पराभूत केले. यासह बार्सिलोनाने चॅम्यिन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.बार्सिलोनाने पहिल्या सत्रातील सामनाही १-० असा जिंकला होता. मँचेस्टर युनायटेड संघाने चांगली सुरुवात केली. मात्र मेस्सीने त्यांच्याकडून झालेल्या चुकांचा अचूक फायदा घेत अवघ्या चार मिनिटात दोन गोल केले.मेस्सीने सामन्याच्या १६ व्या व २० व्या मिनिटाला गोल केले. त्यामुळे मध्यंतरापूर्वीच बार्सिलोनाकडे २-० अशी आघाडी होती. उत्तरार्धात ६१ व्या मिनिटाला फिलिप कोटिन्होने आणखी गोल करत सामना ३-० असा जिंकण्यास मदत केली. (वृत्तसंस्था)>युवेंट्सला पराभवाचा धक्कातुरीन : मॅथिआस डी लिटने हेडरद्वारे केलेल्या गोलच्या जोरावर एजाक्सने युवेंट्सला २-१ ने मात देत चॅम्पियन्स लीग स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. युवेंटस्कडून एकमेव गोल ख्रिस्तियानो रोनाल्डोने केला. एजाक्सने १९९७ नंतर प्रथमच अंतिम चार संघात धडक मारली. रोनाल्डोने २८ व्या मिनिटाला हेडरवर गोल केला. मध्यंतरापूर्वी डोनी वेन डी बिक याने गोल करत १-१ अशी बरोबरी साधली. उत्तरार्धात डी लिट याने गोल करत एजाक्सला २-१ असे विजयी केले.
बार्सिलोना उपांत्य फेरीत, मँचेस्टर युनायटेडविरुद्ध मेस्सीचे दोन गोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 4:31 AM