लिस्बन : स्टार खेळाडू थॉमस मुल्लर व फिलीप कॉन्टिन्हो यांनी केलेल्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर बायर्न म्युनिचने चॅम्पियन लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरी गाठताना बलाढ्य बार्सिलोना एफसीचा ८-२ असा धुव्वा उडवला. मुल्लरने पहिल्याच सत्रात दोन गोल करत बायर्नला मजबूत पकड मिळवून दिली. इवान पेरिसिच आणि सर्ज नाबरी यांनीही प्रत्येकी एक गोल केले. दुसऱ्या सत्रात कॉन्टिन्होने दोन गोल केले. जोशुआ किमिच व रॉबर्ट लेवांडोवस्की यांनी एक गोल केला. बार्सिलोनाकडून लुईस सुआरेजने केला. पहिल्या सत्रात बायर्नच्या डेव्हिड अलाबाने स्वयंगोल केला होता. >१९४६ नंतरचा पहिलाच मोठा पराभवबार्सिलोनाने १९४६ सालानंतर पहिल्यांदाच ८ गोल स्वीकारले आहेत. आता बायर्न पुढील सामन्यात मँचेस्टर सिटी किंवा लियोनविरुद्ध खेळेल. दुसºया उपांत्य सामन्यात पॅरिस सेंट जर्मेन आणि लेइपजिग यांच्यात चुरशीचा सामना होईल. सध्या कोरोना महामारीमुळे या स्पर्धेतील सर्व सामने प्रेक्षकांविना खेळविण्यात येत आहेत.
बार्सिलोनाविरुद्ध बायर्न म्युनिचचे ८ गोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 2:15 AM