शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
2
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
3
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
4
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
5
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
6
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
7
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
8
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
9
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
10
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
11
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
12
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
13
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट
14
"राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील आणि कधी…’’, त्या विधानावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया   
15
सारा अली खानचंं सीक्रेट अफेअर! भाजपा नेत्याच्या मुलाला करतेय डेट? केदारनाथला झाले स्पॉट
16
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
17
प्रियकरासोबत सापडली पत्नी! पती CRPF जवानाचा पारा चढला; रेल्वे स्टेशनवर एकच राडा...
18
IPL 2025मध्येही 'फोडाफोडी'चं राजकारण! पंतला CSKमध्ये आणायला धोनी लावतोय 'फिल्डिंग'?
19
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
20
कवठेमहांकाळात खेला होबे! रोहित पाटलांच्या विरोधात तीन रोहित पाटील; एकाच नावाचे ४ उमेदवार

दिग्गज प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सामने व्हावेत - सुनील छेत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 12:42 AM

भारतीय संघाला जर एएफसी आशिया कप स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असेल तर आगामी सहा महिन्यांमध्ये संघाला दिग्गज प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध मायदेशात व विदेशात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागतील, असे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले.

गुरुग्राम - भारतीय संघाला जर एएफसी आशिया कप स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असेल तर आगामी सहा महिन्यांमध्ये संघाला दिग्गज प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध मायदेशात व विदेशात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागतील, असे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले.छेत्री म्हणाला,‘भारतीय संघाला पुढील वर्षी संयुक्त अरब अमिरातमध्ये ५ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित स्पर्धेसाठी सर्वोत्तम तयारी करावी लागेल. भारतीय संघ २०११ मध्ये या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी झाला होता. त्या वेळी साखळी फेरीत सर्व सामने मोठ्या फरकाने गमावित भारतीय संघ साखळी फेरीतच गारद झाला होता.छेत्री म्हणाला,‘देशाबाहेर सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. मायदेशात आमची कामगिरी चांगली आहे, पण विदेशातील मैदानावर आम्हाला संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे आगामी सहा महिन्यात आम्हाला जास्तीत जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली, तर क्षमतेची चाचणी घेता येईल.आशिया कप स्पर्धेत आम्हाला आशियातील सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळायचे आहे.’छेत्री म्हणाला,‘गट सोपा आहे, असे आम्ही म्हणणार नाही. संयुक्त अरब अमिरातचे रँकिंग आमच्यापेक्षा वरचे आहे. ते गृहमैदानावर खेळणार आहेत. थायलंड संघ गेल्या सहा महिन्यांमध्ये सर्वाधिक सुधारणा करणारा संघ आहे. सहा-सात वर्षांपूर्वी आम्ही थायलंडविरुद्ध खेळलो होतो आणि त्यावेळी २-२ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. ते आशियातील सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळत आहेत. आॅस्ट्रेलिया आणि जपान या संघांसाठी थायलंडला पराभूत करणे कठीण भासत आहे.’भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात ५ जानेवारी रोजी दुबईमध्ये थायलंडविरुद्ध करणार आहे. (वृत्तसंस्था)भारताला विश्वकप पात्रता स्पर्धेत इराण, ओमान, तुर्कमेनिस्तान व गुआम या संघांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. स्टीफन कान्स्टेनटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघाचा विश्वकप पात्रता स्पर्धेत १० पैकी केवळ दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. यंदा आॅगस्ट महिन्यात ३४ व्या वर्षांचा होणाºया छेत्रीने मात्र २०११ च्या तुलनेत यावेळी भारताला सोपा गट मिळाला असल्याच्या वृत्ताला असहमती दर्शवली. त्या वेळी भारताच्या गटात आशियाई पॉवरहाऊस आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया या संघांसह बहरिनचा समावेश होता. या वेळी भारताच्या गटात संयुक्त अरब अमिरात, थायलंड आणि बहरिन या संघांचा समावेश आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा