शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बेल्जियमसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक नसे थोडके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 03:56 IST

विजेतेपदाची शर्यत हरलेल्या बेल्जियमला तिसरे स्थान मिळाले हे योग्य झाले! ते प्राप्त करण्यापूर्वी त्यांना उत्तरार्धामध्ये वादळी हवेचा सामना करावा लागला.

-रणजीत दळवीविजेतेपदाची शर्यत हरलेल्या बेल्जियमला तिसरे स्थान मिळाले हे योग्य झाले! ते प्राप्त करण्यापूर्वी त्यांना उत्तरार्धामध्ये वादळी हवेचा सामना करावा लागला. इंग्लंडची मधली फळी त्यांनी केलेल्या दोन बदलांमुळे चांगलीच क्रियाशील झाली होती. त्यांनी बचावफळीची मांडणीही बदलली होती, पण यावर मात केली ईडन हॅझार्डने तो माझ्या दृष्टीने स्पर्धेतला हा सर्वोत्कृष्ट खेळाडू! एका विद्युत वेगाने झालेला हल्ला एका प्रेक्षणीय गोलमध्ये रूपांतरित करण्यात तो यशस्वी झाला. याच लढतीत नव्हे, तर पूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करून केव्हिन डे ब्रुयन आणि थॉमस नेउनियर यांनी त्याला समर्थ साथ दिली.हॅझार्ड आणि त्याच्या साथीदारांचे देशामध्ये जंगी स्वागत होऊ घातले आहे. ब्रुसेल्समध्ये एका खास परेडचे त्यासाठी आयोजन करण्यातआले असून, राजे फिलीप यांच्या उपस्थितीत संघाला सैनिकी सलामी दिली जाईल.मार्कुस रॅशफर्ड आणि जेस्सी लिनगार्ड या उत्तरार्धातील बदली खेळाडूंनी ज्या संधी निर्माण केल्या, त्याचा लाभ उठविण्यात इंग्लंड अपयशी ठरले. हा दोष सर्वस्वी त्यांचाच! पूर्वार्धात चौथ्याच मिनिटाला मेडनियरने ‘स्लाइड’ भारत नासेर चॅडलीच्या क्रॉसला बेमालूम दिशा देत, बेल्जियमला जोरदार सुरुवात करून दिली. हा गोलकर्णधार हॅरी केन आणि रहीनस्टर्लिंग उतरवू शकले असते.त्यामुळे इंग्लंड अडचणीत आले. फुटबॉल-हॉकीमध्ये ‘एका गोलनेमागे पडणे’ केव्हाही चांगले मानले जाते. कारण ती आघाडी टिकविण्याचा दबाव समोरच्यावर येतो. क्रोएशिया विरुद्ध इंग्लंडचे काय झाले?येथे केन-स्टर्लिंगच्या नाकर्तेपणामुळे दबाव उलटा इंग्लंडवर आला. नशीब त्यांचे, त्या जॉन स्टोन्सने डेब्रुयन आणि युरी टिएलमन्सचे फटके ‘ब्लॉक’ केले. शिवाय रोमेलू लुकाकूला एकदा नव्हे, तर तीनदा डे ब्रुयनच्या पासवर चेंडू नियंत्रित करता आला नाही. स्टोन्सने मध्यंतराच्या ठोक्यावर पुन्हा लुकाकूला रोखले नसते, तर कहाणी तेव्हाच संपली असती!गॅरेथ साउथगेट यांनी फेबिअन डेल्फ, फिल जोन्स, डॅनी रोझ, लॉफ्टस-चीक आणि एरिक डायर यांना सुरुवातीस उतरवून आपण नवी योजना आखल्याने संकेतदिले. आपली मधली फळी अधिक सक्रिय, तसेच बचाव फळी मजबूत होईल, हा त्यांचा अंदाज चुकला. म्हणून त्यांनी उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच रॅशफर्ड आणि लिनगार्ड यांना आपले. स्टर्लिंगवर मात्र त्यांनी बराच वेळ, तर केनवर पूर्ण वेळ भरवसा ठेवला. हे तसे अतीच. लिनगार्डनेएक जबरदस्त ‘व्हॉली’ मारली, पण त्याचा नेम अचूक नव्हता. बेल्जियमने फिरून प्रत्युत्तर दिले, पण लुकाकूचीच तीच समस्या प्रकर्षाने पुढे आली. चेंडूवरील खराब नियंत्रण! डेल्फने मेडनियरला ‘स्लाइड’ मारत वेळीच थोपविले.इंग्लंडने पुन्हा नियंत्रण मिळविले खरे, पण गोल करणे त्यांना जमले नाही. डायरचा धोका वाढतच चालला होता, पण त्याने दोन संधी वाया घालविल्या. त्यापैकी पहिली घालविताना त्याने जमिनीलगत कमजोर फटका मारला. थिबाँ कुर्तोआवर त्याचा परिणाम थोडाच झाला. त्याचा हेडर जर अचूक असता, तर बेल्जियमची पंचाईत झाली असती.मात्र, डायरने एकदा उजवीकडून मुसंडी मारून कुर्तोआला चकविले. त्याने त्याच्या पायात सूर मारणाऱ्या गोलरक्षकावरून चेंडू ‘चिप’ केला, पण स्वर्गातून एखाद्या देवदूताने अलगद उतरावे, तसा टोनी अ‍ॅल्डविरल्ड गोलरेषेवर टपकला आणि त्याने इंग्लंडच्या तोंडचा घास पळविला. एकदा कोठे इंग्लंडला ‘ओपन प्ले’ मध्ये गोल मिळाला असता, तोही नाही झाला.गॅरेथ साउथगेट यांचे ‘वर्क इन प्रोग्रेस’ या वेळी तरी अपूर्ण अवस्थेत खंडित झाले. त्यांना व त्यांच्या चेल्यांना ‘ओपन प्ले’ मध्ये गोल करण्याचे महत्त्व नक्कीच पटले. आपल्या संघाची आपण विनाकारण हवा केली, याची इंग्लिश मीडियाला जाणीव झाली असावी.>बेल्जियमचे प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझनी अडखळणाºया टिएलमन्सला काढले आणि दोन मिनिटांत बेल्जियमला सुवर्णसंधी मिळाली, पण डे ब्रुयन, हॅझार्ड आणि मर्टन्स यांनी रचलेल्या आक्रमणांनी मेडनियरची जबरदस्त व्हॉली पिकफर्डने रोखली, पण तोही ८८व्या मिनिटाला हॅझार्डचे ते आक्रमण थोपवू शकला नाही व या लढतीच्या निकालावर शिक्कामोर्तब झाले.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८russiaरशिया