FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेला कालपासून सुरूवात झाली आणि नव्या वादालाही तोंड फुटले. कतारला फुटबॉल वर्ल्ड कपचे यजमानपद जाहीर झाल्यापासून वाद सुरू झालाच होता. त्यात येथे मद्यबंदी, महिलांच्या पोषांखावरील बंदी अशा नियमांमुळे नाराजीचा सुरू होताच. आता आणखी एक वाद सुरू झाला आहे आणि त्यात थेट भारतीय जनता पार्टी ( भाजपा) उडी घेतली आहे. भाजपा प्रवक्ता सॅव्हीयो रॉड्रीगेज ( Savio Rodrigues) यांनी फिफा वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.
इंग्लंडचा फॅन बिअरच्या शोधात पोहोचला 'शेख'च्या घरात, त्याने दाखवले वाघ, सिंह अन्... Video
रॉड्रीगेज यांनी भारत सरकार, भारतीय फुटबॉल महासंघ व देशातील फुटबॉल प्रेमींना फिफा वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्याला वादग्रस्त इस्लामिक वक्ता डॉ. झाकीर नाईक ( Zakir Naik) याला बोलवण्यामुळे भाजपाकडून बहिष्काराची मागणी केली गेली आहे. सोशल मीडियावरही #BoycottFifaWorldCup ट्रेंड सुरू झाला आहे. फिफा वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान इस्लाम या विषयावर व्याख्यान देण्यासाठी झाकीर नाईक यांना बोलावले गेले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"