जगरेब : विश्वकप स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर क्रोएशियामध्ये भावना उचंबळून आल्या आहेत. कुठे आनंदाश्रूंना वाट मोकळी झाली आहे, तर कुठे हास्याचे कारंजे फुलले आहेत. कुठे आतषबाजी होत आहे तर कुठे नारेबाजीमुळे आसमंत दुमदुमला आहे.सरकारी एचआरटी टीव्हीचे समालोचक ड्रागो कोसिच आनंदाने म्हणाले, ‘क्रोएशिया शानदार विजय, रशियात सर्वांत मोठा चमत्कार.’ जगरेबमध्ये मुख्य चौकात मुसळधार पावसानंतरही हजारोंच्या संख्येने फुटबॉलप्रेमींनी गर्दी केली होती. क्रोएशियाच स्टार खेळाडू ल्युका मोडरिच म्हणाला,‘आम्हाला अभिमान असून आम्ही खूश आहोत. आम्ही येथेच थांबणार नाही.’विजयी गोल नोंदवणारा मँडझुकिच म्हणाला, ‘इंग्लंडविरुद्ध एका गोलने पिछाडीवर पडल्यानंतर महान संघच पुनरागमन करू शकतात. आम्ही शानदार खेळ केला.’ क्रोएशियाच्या रस्त्यांवर राष्ट्रध्वाजाच्या रंगाचे वस्त्र गुंडाळून लोकांचा समूह जल्लोष करताना दिसला. आपल्या मित्रांसह जल्लोष करीत असलेला फ्रान कुलिच म्हणाला, ‘ही भावनिक सायंकाळ आहे. आमच्यासाठी हा मोठा विजय आहे.’1सलग तिसरा सामना अतिरिक्त वेळेत खेळताना क्रोएशियाने बाजी मारली.2विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य सामना अतिरिक्त वेळेनंतर पेनल्टी शूटआऊटविना संपला.3याआधी विश्वचषक स्पर्धेत ५ सामने अतिरिक्त वेळेत खेळले गेले असून या सर्व सामन्यांचे निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागले आहेत.4विश्वचषक उपांत्य सामन्याचा निकाल अतिरिक्त वेळेतच लागण्याची पहिलीच वेळ.5विश्वचषक उपांत्य सामन्यात आघाडी घेतलेला संघ पराभूत होण्याची केवळ दुसरी वेळ.6याआधी १९९८ साली क्रोएशियाने विश्वचषक उपांत्य फेरी गाठली होती. त्यावेळी त्यांना यजमान फ्रान्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.क्रोएशियाच्या मँडझुकिचने फुटबॉलचे धडे गिरवले जर्मनीतक्रोएशियाच्या फुटबॉल चाहत्यांचे नजरेत ‘हीरो’ ठरलेला मारियो मँडझुकिचने फुटबॉलचे धडे आपल्या देशात नव्हे तर जर्मनीमध्ये गिरवली. कारण क्रोएशियाच्या स्वातंत्र्याच्या लढाईच्या काळात त्याचे आईवडिलांना तेथे पाठविण्यात आले होते.क्रोएशियामध्ये १९९१ ते १९९५ दरम्यान स्वातंत्र्य लढाईच्या काळात मँडझुकिचच्या आई-वडिलांना जर्मनीत पाठविण्यात आले. त्याने १९९२ मध्ये स्टुटगार्टजवळ जर्मन क्लब टीएसएफ डिजिंजेनसाठी खेळणे सुरू केले. १९९५ मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर ते मायदेशी परतले. त्यानंतर मँडझुकिचने युरोपियन फुटबॉलचे लक्ष वेधले.आक्रमकता व मानसिक कणखरता यामुळे मँडझुकिच दडपणाखाली गोल करण्यात तरबेज आहे. डेन्मार्कविरुद्ध त्याने बरोबरी साधणारा गोल नोंदवत सामना अतिरिक्त वेळेत नेला. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने विजय मिळवला होता. यजमान रशियाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आंद्रेच क्रामारिचच्या बरोबरी साधणाऱ्या गोलच्या सूत्रधार तोच होता.
विजयानंतर क्रोएशियामध्ये जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 5:20 AM