मुंबई - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर खेळाडूंच्या ट्रान्सफरसाठी चढाओढ सुरू झाली आहे. युव्हेंट्सने सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला करारबद्ध केले आणि रेयाल माद्रिद क्लबला मोठी धक्का दिला. रोनाल्डोनंतर रेयालचा स्टार कोण, याची चिंता सर्वांना सतावत होती. पण, याचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी बेल्जियमचा कर्णधार आणि चेल्सीच्या स्टार खेळाडूशी रेयालने सुरू केलेली चर्चा अंतिम टप्प्यात आहे. विश्वचषक स्पर्धेतील बेल्जियमच्या स्वप्नवत वाटचालीला उपांत्य फेरीत फ्रान्सने ब्रेक लावला. त्यानंतर बेल्जियमचा कर्णधार इडन हॅझार्डने रेयाल माद्रिद क्लबकडून खेळणार असल्याचे संकेत दिले होते. तो म्हणाला, चेल्सीसोबतच सहा वर्षांचा अविस्मरणीय प्रवास सोडण्याची वेळ आली आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर मी दुस-या क्लबच्या शोधात होतो. नव्या क्लबसोबत जायचे की नाही हा निर्णय मी घेणार आहे, परंतु अंतिम निर्णय हा चेल्सी क्लबचा असेल. मला नक्की कुठे जायचे आहे, याची तुम्हाला कल्पना आहेच.
रोनाल्डोची रिप्लेसमेंट करणार चेल्सीचा हा स्टार खेळाडू?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 1:46 PM