Corona Virusमुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. ला लिगा, बुंदेसलिगा, इंग्लिश प्रीमिअर लीग, सीरि ए इटालियन लीग, युरोपियन लीग २०२० आदी अनेक मोठ्या फुटबॉल स्पर्धांनाही त्याची झळ सोसावी लागली आहे. युरोपमधील विविध क्लबच्या अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. कोरोना लागण झालेल्यांची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक क्लबमधील फुटबॉलपटूंना एकांतवासात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एकांतवासात गेलेल्या फुटबॉलपटूंचे मानसिक संतुलन ढासळत चालल्याचा दावा मानसोपचारतज्ज्ञ स्टीव्ह पोप यांनी केला आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगचे सामने ४ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आले आहेत, तर चॅम्पियन्स लीग आणि युरोपा लीग रद्दच करण्यात आल्या आहेत. युरोपियन चॅम्पियनशीप २०२१पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक फुटबॉलपटूंना घरीच बसावे लागले आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना एकांतवासाचा काही फरक पडलेला नाही. पण, ज्यांना सामने खेळल्यावरच पैसे मिळतात अशा फुटबॉलपटूंना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे.
प्रीमिअर लीगमधील अनेक खेळाडू एकांतवासात आहेत. आर्सेनल क्लबचे प्रमुके मायकेल आर्तेटा आणि चेल्सीचा स्टार खेळाडू कॅलम हुडसन-ओडोई यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर फुटबॉलपटूंमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात एकांतवासात राहत असल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळत असल्याचे स्टीव पोप यांनी सांगितले. ''प्रीमिअर लीगमधील खेळाडूंमध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना काही तणाव नाही. पण, त्यांना सेलिब्रेटी असल्याचं आता मिरवता येत नाही. त्यामुळे त्यांनाही काहीतरी चुकल्याचुकल्या सारखं वाटत आहे,'' असे पोप यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,'' मला एका खेळाडूचा फोन आला आणि त्यानं मला तणावात आपण पत्नीच्या बहिणीसोबत शरीरसंबंध ठेवल्याचे सांगितले. काही खेळाडूंचे मानसिक खच्चिकरण झाले आहे. काही खेळाडू एकमेकांशी सतत फोनवरून संवाद साधत आहेत. एकमेकांना काय खावं, कसा सराव करावा याबबत सल्ले देत आहेत. काही खेळाडू नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत.''
पोप यांनी त्या खेळाडूचं नाव मात्र गुपित ठेवले. ते म्हणाले,''अनेक खेळाडूंना त्यांच्या भविष्याची चिंता लागलेली आहे. आपल्याला पुन्हा खेळायला मिळेल की नाही, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. काही खेळाडू ३३ वर्षांचे आहेत आणि त्यांना कारकिर्द संपुष्टात येईल असे वाटत आहे. त्यामुळे त्यांच्यातला मानसिक ताण वाढत आहे.'' हा एकांतवास आता त्यांना नकोसा वाटू लागला आहे आणि त्याला वैतागून एका फुटबॉलपटूनं स्वतःच्या पत्नीच्या बहिणीसोबत शरीरसंबंध ठेवल्याचे धक्कादायक कृत्य घडले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
BCCI नं पर्याय शोधला; IPL 2020 होणार अन् धावांचा पाऊस पडणार, पण कधी?
Video : कोरोनाला हरवण्यासाठी Sachin Tendulkarची बॅटिंग; पाहा 'क्रिकेटचा देव' काय सांगतोय
#OnThisDay : सचिन तेंडुलकर युगाचा अंत अन् टीम इंडियाला गवसला नवा स्टार
... तर MS Dhoniचं टीम इंडियात पुनरागमन झालंच पाहिजे, माजी सलामीवीर सरसावला
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना १४ दिवसांसाठी एकांतवासात जाण्याच्या सूचना