माद्रिद - ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि रेयाल माद्रिद 2009 पासून जोडले गेलेले नाते नऊ वर्षांनी मंगळवारी अखेरीस संपुष्टात आले. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अपयशानंतर रोनाल्डो माद्रिद क्लबला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा गेला आठवडाभर सुरू होत्या. त्या चर्चाच ठराव्या अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना होत्या. पण, तसे झाले नाही, रोनाल्डोने इटालियन क्लब युव्हेंट्सची 88 मिलियन पौंडची म्हणजेच भारतीय रकमेत 800 कोटी रूपयांची ऑफर स्वीकारली. रेयाल माद्रिद क्लबने त्यांच्या अधिकृत साईटवर त्याबाबतची घोषणा केली. माद्रिद क्लबशी चर्चा करूनच रोनाल्डोने हा निर्णय घेतला. युव्हेंट्स क्लबचे अध्यक्ष आंद्रेया अँजेली हे मंगळवारी दुपारी खासगी विमानाने रोनाल्डोला भेटण्यासाठी ग्रीसमध्ये दाखल झाले. रोनाल्डो कुटुंबासमवेत येथे फिरण्यासाठी आलेला आहे. तेथेच युव्हेंट्स आणि रोनाल्डो यांच्यात करार झाला. त्याला चार वर्षांसाठी युव्हेंट्सकडून 4.55 लाख रूपये प्रती आठवड्याला मिळणार आहेत. त्यानंतर रेयाल माद्रिद क्लबनेही या वृत्ताला दुजोरा दिला. रोनाल्डोने नऊ वर्षांत माद्रिदसोबत चॅम्पियन्स लीगची चार जेतेपद नावावर केली आहेत. यापलिकडे त्याने या नऊ वर्षांत अनेक विक्रम नोंदवले आहेत.
ख्रिस्तियानो रोनाल्डोने स्वीकारली ही मोठी ऑफर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 9:21 PM