पोर्तुगाल : ख्रिस्तियानो रोनाल्डो... जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू.. फार कमी फुटबॉलपटू असतील की जे हयात असताना त्यांचे पुतळे उभारले गेले आहेत आणि पोर्तुगालमध्ये तर रोनाल्डोचे असे अनेक पुतळे पाहायला मिळतील.. रेयाल माद्रिद क्लबला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रोनाल्डोची लोकप्रियता कमी होईल असा कयास लावला गेला. मात्र आपल्या दर्जेदार खेळाच्या जोरावर त्यांनी अनेकांना चुकीचे सिद्ध केले. पण रोनाल्डो सध्या चर्चेत आहे तो त्याच्या पुतळ्यामुळे.
पोर्तुगालमधील फुंचाल येथील म्युझियममध्ये रोनाल्डोचा कांस्य धातूचा पुतळा उभारण्यात आला आहे. गोल केल्यानंतर आनंद साजऱ्या करण्याच्या रोनाल्डोच्या स्टाईलप्रमाणेच हा 11 फुट उंचीचा पुतळा तयार करण्यात आला आहे. तसाच पुतळा मडेरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभारण्यात आला आहे आणि तो लोकांना एका विचित्र कारणामुळे आकर्षित करत आहे.
पुतळ्यात रोनाल्डोच्या शरीरातील एक अवयव अपेक्षेपेक्षा अधिक चकचकीत दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांना हसू आवरत तर नाही परंतु त्यासोबत फोटो काढण्याचा मोहही त्यांना आवरता येत नाही.