नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) आय लीग क्लबसाठी सहा विदेशी खेळाडूंमध्ये एक खेळाडू आशियाई असावा ही अट काढून टाकली आहे. २०१९-२० सत्रासाठी विदेशी खेळाडूंची संख्या पाचपर्यंत मर्यादित केली. एआयएफएफच्या लीग समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. विदेशी खेळाडूंबाबत समितीने मागच्या वर्षीचा नियम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.आशियाई खेळाडूंचा कोटा रद्द ठरविला आहे. २०१८-१९ या सत्रात मात्र संघांना सहा विदेशी खेळाडू खेळविण्याची मुभा असेल. पुढील सत्रात मात्र ही संख्या पाच असेल.
आय लीगमधील विदेशी खेळाडूंच्या संख्येत कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 3:56 AM