शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भारताचे आव्हान संपुष्टात, ४-० गोलने पराभूत : घाना अंतिम सोळांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:16 IST

एरिक अयाहने नोंदविलेले २ गोल आणि बदली खेळाडू रिकार्ल्डा डान्सो व इमानुअल टोकूने केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर गत दोन वेळचा विजेता घाना संघाने भारतीय संघाचा ४-० गोलने पराभव करून १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील आपली

नवी दिल्ली : एरिक अयाहने नोंदविलेले २ गोल आणि बदली खेळाडू रिकार्ल्डा डान्सो व इमानुअल टोकूने केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर गत दोन वेळचा विजेता घाना संघाने भारतीय संघाचा ४-० गोलने पराभव करून १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली. कोलंबियाविरुद्ध चांगल्या खेळाचे प्रदर्शन करणाºया भारतीय संघाला गुरुवारी सलग तिसरा पराभव पत्करावा लागल्यामुळे या स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सुरुवातीला घाणाच्या चपळ खेळाडूंना बरोबरीची टक्कर दिली. पण, घानाच्या आक्रमक आणि नियोजनबद्ध पासमुळे नंतर सामन्यावर त्यांचे वर्चस्व वाढू लागले. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सुमारे ५२ हजार प्रेक्षकांच्या जोरदार पाठिंब्याने भारतीय संघातील खेळाडूंचा उत्साह वाढत होता. पण, घानाच्या खेळाडूंच्या आक्रमकतेमुळे भारतीय संघाची बचाव फळी खिळखिळी झाली. सहाव्या मिनिटाला भारताच्या बचाव फळीला चकवून घाना संघाचा आघाडीचा खेळाडू एरिक अयाह हा भारतीय गोलपोस्टच्या दिशेने घुसला. त्या वेळी भारताचा गोलरक्षक धीरज सिंग एकटाच होता. या वेळी ब्लॅक कॅट्स (घाना)च्या फॉरवर्ड लाईनवर असलेल्या पंचाने त्याला आॅफसाईड म्हणून झेंडा वर केला. त्यामुळे त्याची गोल करण्याची संधी हुकली.

घाना संघाचा राईट विंगर सादीक इब्राहिमने लागोपाठ भारतीय गोलवर चढाया करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना दबावाखाली आणले. भारताचा डिफेंडर संजीव स्टॅलिनने त्याला प्रत्येक वेळी रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, घानाच्या या खेळाडूने २०व्या मिनिटात भारताच्या गोलमध्ये चेंडू मारला. पण, धीरज सिंगने तो चपळाईने अडविला. आज झालेल्या संपूर्ण सामन्यात धीरज सिंगने घानाच्या अनेक आक्रमणांना चपळाईने अडवून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. ३४व्या मिनिटाला भारताच्या बोरिसला पंचांनी नियमबाह्य खेळ केल्यामुळे पिवळे कार्ड दाखविले. आजच्या सामन्यात विशेषकरून भारताच्या बचाव फळातील खेळाडू स्टॅलिन अन्वर आणि बोरिस थंगजाम यांनी घाना खेळाडूंच्या अनेक आक्रमणांना रोखून धरणात यश मिळविले.भारताने जरी पराभव पत्करला असता, तरी संघातील खेळाडूंनी प्रेक्षकांची मने मात्र जिंकली होती. संपूर्ण स्पर्धेवर ६५ टक्के घानाच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले होते. भारताविरुद्धच्या विजयानंतर घानाने ३ सामन्यांत ६ गुण संपादन करून ‘अ’ गटात अग्रस्थान मिळविले. कोलंबिया आणि अमेरिका प्रत्येकी ६ गुणांनंतर अनुक्रमे दुसºया व तिसºया क्रमांकावर आहेत. (वृत्तसंस्था)४३व्या मिनिटाला घानाच्या ऐरिकने एक उत्कृष्ट चाल रचून आपल्या संघाचा पहिला गोल नोंदविला. हा पहिला गोल झाल्यानंतर घाना संघाच्या खेळाडूंनी जलद खेळ करण्यास सुरुवात केली.त्यातच पुन्हा ऐरिकला ५२व्या मिनिटाला मिळालेल्या संधीचा त्याने पूर्ण फायदा घेऊन संघाचा व स्वत:चा दुसरा गोल केला. त्यानंतर त्यांच्या रिकार्डो डान्सोने ८६व्या मिनिटाला संघाचा तिसरा आणि लगेचच एका मिनिटाने इमानुअल टोकोने ८७व्या मिनिटाला चौथा गोल केला.५३व्या मिनिटाला भारताच्या लालेगमवाईला बॉक्सच्या बाहेर चेंडू मिळाल्यानंतर त्याने गोल करण्याचा प्रयत्न केला; परंतु चेंडू थेट घानाचा गोलरक्षक इब्राहिम डॅनलॅण्डच्या हातात गेला.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल