FIFA World Cup 2022 : इंग्लंडच्या फुटबॉल संघाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात विक्रमी विजय मिळवला.१९६६ सालच्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडने युवा ब्रिगेडच्या उल्लेखनीय खेळाच्या जोरावर आशियाई चॅम्पियन इराणवर ६-२ असा विजय मिळवला. ज्यूड बेलिंगहॅम, बुकायो साका ( दोन गोल), रहिम स्टर्लिंग, जॅक ग्रेलिश व मार्कस रॅशफोर्ड या इंग्लंडच्या फ्युचर स्टार्सनी गोल केले. इराणकडून मेहदी तरेमीने दोन गोल केले. पण, मैदानावर हा सामना सुरू होण्यापूर्वी मैदानाबाहेर वेगळाच प्रकार घडला. कतारच्या नियमानुसार येथे बिअरवर बंदी आहे आणि त्यामुळे फुटबॉल फॅन्स नाराज आहेत. तरीही कुठे बिअर मिळतेय का, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. बिअरच्या शोधात इंग्लंडचे काही फॅन्स शेख पॅलेसपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर जे घडले, हे त्यांनी व्हिडीओ पोस्ट करून सांगितले.
आधी कचाकचा भांडले अन् मग जे घडलं ते सारेच पाहत बसले, कतार-इक्वेडोर लढतीत 'अजब' सामना
कालच्या सामन्यात ज्यूड बेलिंगहॅम हा इंग्लंडकडून वर्ल्ड कपमध्ये गोल करणारा दुसरा युवा खेळाडू ठरला. यापूर्वी ओवेनने १९९८मध्ये १९ वर्ष व १९० दिवसांचा असताना गोल केला होता. बुकायो साका ( २१ वर्ष व ७७ दिवस) याने वर्ल्ड कप स्पर्धेच्या त्याच्या पहिल्याच सामन्यात २+ गोल केले. १९६६ साली फ्रान्झ बेकनबोएर ( २० वर्ष व ३०४ दिवस) यांच्यानंतर साका हा दुसरा युवा खेळाडू ठरला. बदली खेळाडू म्हणून आलेल्या मार्कस रॅशफोर्डने आज ४९ सेकंदात गोल केला आणि वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात इंग्लंडसाठी बदली खेळाडूने केलेला हा तिसरा जलद गोल ठरला. या सामन्यापूर्वी इंग्लंडचे चाहते बिअरच्या शोधात शेख पॅलेसपर्यंत पोहोचले.
त्या संदर्भातला व्हिडीओ सध्या सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. माजीद फ्रीमन याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यात त्याने लिहिले की, इंग्लंडचे दोन चाहते बिअरच्या शोधात होते आणि ती शोधता शोधता शेख पॅलेसमध्ये पोहोचले. या व्हिडीओतील इंग्लंडचा फॅन सांगत होता की, काल रात्री आमची शेखच्या मुलाशी भेट झाली आणि त्याने आम्हाला पॅलेसच्या मागच्या बाजूला नेले. तेथे सिंह आणि सर्वकाही होतं. त्यांनी आमचं आदरातिथ्य केले. आम्ही बिअरच्या शोधात होतो आणि त्यांनी आमच्यासाठी व्यवस्था केली. लँड क्रुझरमध्ये गेलो आणि पूर्ण पॅलेस पाहिले. त्यांनी आम्हाला माकडं, विविध पक्षी दाखवले.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"