शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

विजयी लय राखण्यास इंग्लंड उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 2:00 AM

विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा इंग्लंडचा संघ शानदार फॉर्म कायम राखत उद्या जापानसोबत भिडेल. फिफा १७ वर्षाआतील विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये जापानला पराभूत करत पहिला अडथळा पार करण्यासाठी मैदानात उतरेल.

कोलकाता : विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा इंग्लंडचा संघ शानदार फॉर्म कायम राखत उद्या जापानसोबत भिडेल. फिफा १७ वर्षाआतील विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये जापानला पराभूत करत पहिला अडथळा पार करण्यासाठी मैदानात उतरेल.तीन सामन्यात ११ गोल करणारा इंग्लंडचा संघ फ्रान्सनंतर दुसºया स्थानावर आहे. त्यांचे लक्ष्य तिस-यांदा क्वार्टर फायनलमध्ये जागा बनवण्यावर असेल. मात्र २०११ नंतर इंग्लंडचा संघ अंतिम आठमध्ये पोहचलेला नाही.इंग्लंडने कोरियामध्ये झालेल्या २० वर्षाआतील विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला आहे. आणि पोलंडमध्ये युरो २१ वर्षाआतील अंतिम चारमध्ये जागा बनवली. या संघाने युएफा युरोपीय १७ वर्षाआतील चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्पेनकडून पराभव पत्करला.चिलीत २०१५ मध्ये झालेल्या १७ वर्षाआतील विश्वचषकात इंग्लंड एकही सामना जिंकू शकला नव्हता. आणि तीन सामन्यात फक्त एक गोल केला होता. या वेळी स्टिव्ह कुपर यांच्या मार्गदर्शनात विजेतेपदाचा प्रबळ दावेदार बनला आहे.पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून बाद फेरीत जागा बनवणा-या इंग्लंडने इराकला अखेरच्या सामन्यात ४-० ने पराभूत केले. दुसरीकडे जापानने पहिल्या सामन्यात होंडुरासला ६-१ असे पराभूत केले.फुटबॉलवेड्या स्पेनची लढत फ्रान्ससोबतगुवाहाटी : साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकून आत्मविश्वास वाढलेल्या माजी विजेत्या फ्रान्सचा सामना फिफा १७ वर्षाआतील विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत आघाडीचा संघ स्पेनसोबत होणार आहे. त्यामुळे हा सामना रोमांचक होईल.फ्रान्सने या स्पर्धेत युरोपातून प्ले आॅफ सामना जिंकून पाचवा संघ म्हणून जागा निर्माण केली. या स्पर्धेचा २००१ चा विजेता संघ असलेल्या फ्रान्सचे या स्पर्धेतील प्रदर्शन शानदार राहिले आहे. फ्रान्सने पहिल्या सामन्यात न्यू कॅलेडोनियाला ७-१ ने पराभूत केले. त्यानंतर जापानला २-१ ने पराभूत केले. अखेरच्या सामन्यात होंडुरासला ५-१ ने मात दिली. फ्रान्सच्या संघाने स्पर्धेच्या साखळी फेरीत सर्वाधिक १४ गोल केले आहे.फ्रान्सला या स्पर्धेत सर्वात कडवा प्रतिस्पर्धी म्हणून स्पेनचा सामना करावा लागणार आहे. स्पेन युरोपियन चॅम्पियन आहे.इराकची मंगळवारी मोठी परीक्षामडगाव, गोवा : गतवेळच्या उपविजेत्या माली संघासोबत इराकची मंगळवारी मोठी परीक्षा होणार आहे. इराक संघाचा सामना मंगळवारी रात्री आठ वाजता आफ्रिकन देश मालीच्या विरोधात होईल. या सामन्यात मालीला विजयाचा दावेदार म्हणून पाहिले जात आहे.दोन वेळच्या विजेत्या मालीचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. त्यांनी ग्रुप बी मध्ये दुसºया स्थानावर राहत बाद फेरी गाठली. त्यांनी ग्रुपमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या पॅराग्वेकडून २-३ ने पराभव पत्करला. मात्र त्यानंतर शानदार पुनरागमन करत तुर्कीला ३-० आणि न्यूझीलंडला ३-१ असे पराभूत केले. मालीच्या आक्रमकांसमोर इराकच्या बचावफळीच्या कौशल्याची परीक्षा असेल.इराकचे खेळाडू मालीच्या फॉरवर्ड खेळाडूंना कसे रोखतात, याकडे फुटबॉल चाहत्यांचे लक्ष असेल. या सामन्यात इराकचा संघ कर्णधार मोहम्मद दाऊदशिवाय उतरणार आहे. मालीचा स्ट्रायकर लसाना एनडियाये आणि जिमूसा ट्राओरेने चांगला खेळ केला आहे.मेक्सिकोला इराणचे आव्हानमडगाव : शानदार खेळानंतर आत्मविश्वास वाढलेला दिग्गज संघ इराण मंगळवारी फिफा १७ वर्षाआतील विश्वचषकात इराण विरोधात आपली लय कायम राखण्याच्या उद्देशानेच उतरेल. इराणने तिन्ही सामने जिंकत ग्रुप सी मध्ये अव्वल स्थान पटकावले. चौथ्यांदा या स्पर्धेत खेळत असलेला इराण पहिल्यांदाच अंतिम १६ मध्ये पोहचला आहे. 

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017FootballफुटबॉलEnglandइंग्लंड