Euro 2020: पोर्तुगाल संघाचा कर्णधार अन् जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो Euro 2020 स्पर्धेतील पहिल्या लढतीपूर्वीच चर्चेत आला आहे. रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालनं यूरो चषक स्पर्धेच्या माजी पर्वात जेतेपद पटकावलं होतं आणि जेतेपद कायम राखण्याच्या शर्यतीत त्यांचा पहिल्या सामन्यात हंगेरी संघासोबत सामना होणार आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी कॉन्फरन्स रूममध्ये दाखल होताच टेबलवरील कोका कोलाच्या बॉटल पाहून रोनाल्डो थोडाला नाराज दिसला. त्यानं खूर्चीवर बसताच कोका कोला च्या दोन्ही बॉटल्स खाली ठेवल्या. त्यानंतर त्यानं उपस्थित पत्रकारांना पाणी पिण्याचा सल्ला दिला. कोका कोला हे यूरो 2020 स्पर्धेचे प्रायोजक आहेत, परंतु रोनाल्डोनं त्याची पर्वा केली नाही. रोनाल्डो कधीच सॉफ्ट ड्रींक्स घेत नाही किंवा त्याची जाहीरातही करत नाही.
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या तंदुरुस्तीचे रहस्य
पण, रोनाल्डोच्या या कृतीनं पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक फर्नांडो सांतोस यांच्यासह सर्वांना चकित केलं.
रोनाल्डो हा फिटनेसच्या बाबतीत किती सतर्क आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच वयाच्या 36व्या वर्षीही तो मैदानावर युवा खेळाडूंप्रमाणे खेळ करू शकतो. तो दिवसाला सहा वेळा जेवतो, त्यात फळ, भाज्या आणि प्रोटीन यांचा समावेश असतो. त्याशिवाय तो कसून सरावही करतो.
Wow: ख्रिस्तियानो रोनाल्डोचं 149 कोटींच कार कलेक्शन!
2020च्या एका पुरस्कार सोहळ्यात रोनाल्डोनं त्याच्या मुलाला सॉफ्ट ड्रींक्स पिताना व चिप्स खाताना पाहिले होते आणि त्यानंतर त्यानं नाराजी व्यक्त केली होती. पोर्तुगाल संघाचे पाच युरो स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारा तो पहिला खेळाडू आहे. याशिवाय यूरो स्पर्धेत सर्वाधिक गोल्सचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याला अली डाईल यांचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल्सचा विक्रम मोडण्यासाठी सहा गोल्सची गरज आहे.