Euro 2020 Final, England vs Italy : यूरो स्पर्धेच्या फायनलच्या इतिहासात सर्वात वेगवान गोलचा विक्रम इंग्लंड विरुद्ध इटली यांच्यातल्या सामन्यात नोंदवला गेला. इंग्लंडनं 1.57 मिनिटालाच गोल खाते उघडले, परंतु आतापर्यंत बलाढ्य प्रतिस्पर्धींना कडवी मात देऊन अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या इटलीनं दुसऱ्या हाफमध्ये बरोबरीचा गोल करून इंग्लंड समर्थकांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडवला. दुसऱ्या मिनिटाला मिळालेल्या आघाडीनंतर निर्धास्त झालेल्या थ्री लायन्सला अतिबचावात्मकता महागात पडली. इटलीनं संयमी खेळ करताना चेंडूवर अधिककाळ ताबा ठेवत 90 मिनिटांच्या आणि त्यानंतर अतिरिक्त 30 मिनिटांच्या खेळात सामना 1-1 असा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. उपांत्य फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीनं माजी विजेत्या स्पेनचे आव्हान संपुष्टात आणले होते. त्यामुळे इंग्लंडच्या चाहत्यांना पेनल्टी शूटआऊटचा थरार नको होता. याही सामन्यात इटलीनं बाजी मारली आणि विम्बल्डी स्टेडियमवर स्मशानशांतता पसरली. I̶t̶'̶s̶ ̶c̶o̶m̶i̶n̶g̶ ̶H̶O̶M̶E̶ It's gone to Rome!. हे एका चाहत्यानं काही दिवसांपूर्वी झळकवलेलं फलक खरं ठरलं. इटलीनं 1-1 (3-2) असा विजय मिळवला. Italy win 3-2 on penalties after 1-1 vs England in regulation time
इटलीचा लिओनोर्डो बोनसी ठरला सर्वात वयस्कर गोल स्कोरर...दुसऱ्या हाफच्या चौथ्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर पेनल्टी वर्तूळावरुन इटलीला बरोबरीचा गोल करण्यात पुन्हा अपयश आले. लोरेजो इन्सिग्ने याने ही संधी गमावली. इंग्लंडचा संघ बचावात्मक मोड मध्ये होता. त्यांच्या बचावपटूूनी सुरेख कामगिरी बजावली. सामना पुढे सरकत असताना इटलीच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरील निराशा आणखी वाढत होती. पण ६७व्या मिनिटाला हे नैराश्य नाहीशे झाले. लिओनार्डो बोनसीने इटालीला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. या गोलनंतर लंडनमधील विम्बली स्टेडियमवर सन्नाटा पसरला. आतापर्यंत विजयाच्या नशेत नाचणारे इंग्लंड समर्थक गपगार झाले. यूरो स्पर्धेच्या फायनलमध्ये गोल करणारा बोनसी हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. 34 वर्ष व 71 दिवसांच्या बोनसीनं गोल करून 1976साली बेर्न्ड होलझेमबेन यांचा ( 30 वर्ष व 103 दिवस) विक्रम मोडला. ( Leonardo Bonucci (34 years and 71 days) has become the oldest scorer in a EURO final, beating the previous record of Bernd Hölzenbein in 1976 (30 years and 103 days))
या गोलनं इटलीच्या ताफ्यात जणू प्राण ओतले अन् त्यांचा आक्रमक खेळ सुरू झाला. इंग्लंडलाही बचावात्मक खेळ करण्याची रणनीती सोडून आक्रमणाची कास धरावी लागली. पण इटलीनं छोटे छोटे पास करत खेळ केला अन् 90 + 6 मिनिटांच्या भरपाई वेळेतही बरोबरीची कोंडी फुटली नाही. अतिरिक्त 30 मिनिटांच्या खेळातील सहाव्या मिनिटाला रहिम स्टेर्लिंगचा गोल करण्याचा प्रयत्न इटलीचा कर्णधार जिऑर्जीओ चिएलीनीनं अपयशी ठरवला. गोलजाळीनजीक आलेल्या स्टेर्लिंगनं मारलेला चेंडू चिएलीनीनं अडवला. इटलीही आघाडी घेण्याच्या अगदी नजीक आली होती, परंतु त्यांच्याही वाट्याला निराशा आली. इटलीच्या या कमबॅकनं इंग्लंडच्या चाहत्यांना मात्र तणावात ढकलले होते. अतिरिक्त 30 मिनिटांच्या खेळातही 1-1 अशी बरोबरी कायम राहिली.
पेनल्टी शूटआऊटचा थरारइटली - डी बेराडीनं ( गोल), ए बेलोट्टी ( संधी गमावली), लिओनार्डो बोनसी ( गोल), एफ बेर्नाडेसी ( गोल), इंग्लंड - हेरी केन, एच मार्गुरे, रशफोर्ड ( संधी गमावली, चेंडू गोलजाळीला लागून माघारी), सांचो ( संधी गमावली), बी साका ( संधी गमावली)