शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Euro 2020 : ख्रिस्तियानो रोनाल्डोमुळे Coca Cola चं ३ हजार कोटींचं नुकसान, तरीही पटकावला मानाचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 10:29 AM

यूरो २०२० स्पर्धेचे जेतेपद इटलीनं पटकावलं. १९६८नंतर दोनवेळा ( २००० व २०१२) इटलीला जेतेपदानं थोडक्यात हुलकावणी दिली होती, परंतु यावेळी त्यांनी इंग्लंडला त्यांच्याच घरी पराभूत करून ५३ वर्षांनी जेतेपद पटकावले.

यूरो २०२० स्पर्धेचे जेतेपद इटलीनं पटकावलं. १९६८नंतर दोनवेळा ( २००० व २०१२) इटलीला जेतेपदानं थोडक्यात हुलकावणी दिली होती, परंतु यावेळी त्यांनी इंग्लंडला त्यांच्याच घरी पराभूत करून ५३ वर्षांनी जेतेपद पटकावले. पेनल्टी शूटआऊटमध्ये रंगलेल्या सामन्यात इटलीनं १-१ ( ३-२) अशी बाजी मारली. या फायनलनंतरच्या पुरस्कार सोहळ्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो हे नाव चर्चेत राहिले. गतविजेत्या पोर्तुगालचे आव्हान यंदा उपउपांत्यपूर् फेरीतच संपुष्टात आले आणि रोनाल्डो चर्चेत राहिला तो Coca Colaला बसलेल्या ३ हजार कोटींच्या नुकसानीमुळे. तरीही रोनाल्डोनं या स्पर्धेतील मानाचा गोल्डन बूट पुरस्कार जिंकला. ( Portuguese superstar Cristiano Ronaldo claimed his first European Championship Golden Boot)

इटलीनं 53 वर्षांनंतर पटकावलं यूरो जेतेपद; इंग्लंडचे घरच्या मैदानावर शूट आऊट!

पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डो पहिल्या सामन्यापूर्वीच चर्चेत आला. पत्रकार परिषदेत रोनाल्डोनं त्याच्यासमोर ठेवलेल्या दोन कोका कोलाच्या बॉटल बाजूला केल्या अन् पाणी पिण्याचा सल्ला दिला. यूरो स्पर्धेचे प्रायोजक असलेल्या कोका कोलाचे त्यानंतर शेअर गडगडले अन् त्यांना जवळपास ३ हजार कोटींचा फटका बसला. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बेल्जियमकडून त्यांना १-० अशी हार मानावी लागली. रोनाल्डोनं या स्पर्धेत सर्वाधिक ५ गोल्स केले आणि त्या ३६० मिनिटाचा खेळ करताना १ गोल करण्यात मदतही केली. त्यामुळे त्याला गोल्डन बूट हा पुरस्कार देण्यात आला.  

झेक प्रजासत्ताकच्या पॅट्रीक शिंकनं ४०४ मिनिटांचा खेळ करताना ५ गोल्स केले, परंतु त्यानं एकही गोल करण्यात सहाय्य केले नाही. इंग्लंडचा कर्णधार हेरी केन याला (४) फायनलमध्ये रोनाल्डोला मागे टाकण्याची संधी होती. रोनाल्डोनं प्रथमच युरो चषक स्पर्धेत गोल्डन बूट पुरस्कार जिंकला.  युरो स्पर्धेत सर्वाधिक १४ गोल्सचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १०९ गोल्स करताना इराणचे स्ट्रायकर अली डाई यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.   

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोPortugalपोर्तुगाल