१२ वर्षांनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळणार आहे. पोर्तुगालच्या सुपरस्टार फुटबॉलपटूनं इटालियन क्लब युव्हेंटससोबतचा करार संपुष्टात आणला अन् स्वगृही परतला. ३६ वर्षीय रोनाल्डोनं २००३ ते २००९ या कालावधीत मँचेस्टर युनायटेडसाठी २९२ सामन्यांत ११८ गोल्स केले आहेत. सर अॅलेक्स फर्ग्युसन यांच्यामुळे जगाला रोनाल्डो हा अव्वल दर्जाचा खेळाडू मिळाला. फर्ग्युसन यांनी २००९मध्ये रोनाल्डोला इंग्लिश प्रीमिअर लीग ( EPL) हे मोठे व्यासपीठ दिले आणि त्यानंतर रोनाल्डोनं मागे वळून पाहिलेच नाही. त्यामुळे रोनाल्डोचा हा निर्णय त्याच्या फॅन्सला प्रचंड आनंद देणारा आहे. क्विन एलिझाबेथ II ( Queen Elizabeth II ) याही रोनाल्डोच्या जबरदस्त फॅन असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
जगात भारी, विराट कोहली!; कॅप्टन कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम!
रोनाल्डोनं मँचेस्टर युनायटेडसाठी पुन्हा खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्विन एलिझावेथ II यांनी मँचेस्टर युनायटेड क्लबकडून रोनाल्डोचं नाव असलेल्या ८० जर्सी मागवल्याचे वृत्त इंग्लिश मीडियात प्रसिद्ध झाले आहे. क्विन एलिझावेथ II यांना त्यांच्या स्टाफसाठी त्या जर्सी हव्या आहेत. क्विन एलिझावेथ II त्यांनी स्वतःसाठी रोनाल्डोची स्वाक्षरी असलेली जर्सी मागवल्याचाही दावा करण्यात आला आहे. पण हे खरं आहे का?
ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडसोबत खेळणार असल्याचे १ सप्टेंबरला जाहीर करण्यात आले, त्यानंतर या अफवा सुरू झाल्या. क्विन एलिझावेथ II यांनी रोनाल्डोची स्वाक्षरी असलेली जर्सी मागितल्याची चर्चेनं जोर धरला. Sport Innovation Society या ट्विटर हँडलवर ही बातमी प्रसिद्ध झाली अन् चर्चा अधिक वाढल्या. पण, अशी कोणतीच मागणी महाराणींनी केली नाही. Sport Innovation Society नं ते ट्विट डिलिट केलं अन् आम्ही बातमीची शाहनिशा केली नसल्याचं त्यांन स्पष्ट करून माफी मागितली.