हे वर्ष फुटबॉलसाठी खास असेल. जागतिक फुटबॉल फेडरेशनने (फिफा) भारताला १७ वर्षांखालील मुलींच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद बहाल केले आहे. यासह दुसऱ्यांदा फिफाची स्पर्धा देशात होईल. चार शहरांमध्ये २ ते २१ नोव्हेंबर २०२० मध्ये होणाºया या स्पर्धेत भारतासह १६ देशांचा सहभाग आहे. भुवनेश्वर, कोलकाता, गुवाहाटी व अहमदाबाद यांची प्रायोगिक तत्त्वावर स्पर्धा केंद्र म्हणून निवड झाली.जागतिक स्तरावर कोपा अमेरिका आणि युरो कप या दोन स्पर्धांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अर्जेंटिना कोपा अमेरिकेचा सहआयोजक असल्याने लिओनेल मेस्सीवर लक्ष असेल. त्यांचाच लो सेल्सो हा युवा खेळाडूही छाप पाडू शकतो. कोपा अमेरिकेची ४७ वी स्पर्धा कोलंबिया-अर्जेंटिना येथे १२ जून ते १२ जुलै २०२० दरम्यान होईल.याशिवाय युरो कप स्पर्धेचा थरार युरोपातील १२ केंद्रांवर १२ जून ते ११ जुलै दरम्यान रंगेल. यामध्ये इटली, स्वित्झर्लंड, टर्की, वेल्स, बेल्जियम, डेन्मार्क, फिनलँड, रशिया, आॅस्ट्रिया, नेदरलँड्स, युक्रेन, क्रोएशिया, झेक प्रजासत्ताक, इंग्लंड, पोलंड, स्पेन, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी व पोर्तुगाल हे पात्र ठरले असून अद्याप चार संघांचा प्रवेश बाकी आहे.
फिफा, कोपा, युरो; यंदाचं वर्ष फुटबॉल प्रेमींसाठी पर्वणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 3:36 AM