कझान - आता मी केवऴ प्रेक्षकाच्या भूमिकेत दिसणार. खेऴाडू म्हणून माझा प्रवास येथेच संपत आहे, अर्जेंटिनाच्या झेव्हियर मास्केरानोने निवृत्तीची घोषणा करताना व्यक्त केलेले मत. अर्जेंटिनाचा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील फ्रान्सविरुद्धचा पराभव त्याच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. मास्केरानोने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम लावला आणि अर्जेंटिना संघाला निवृत्तीची पहिली झऴ बसली.शनिवारी झालेल्या लढतीनंतर 145 सामन्यांत राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणा-या 34 वर्षीय मास्केरानोने घेतलेला निर्णय हा संघाला पुढील धोक्याचा इशारा आहे. सलग चौथ्या विश्वचषक स्पर्धेत त्याने संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो म्हणाला, आंतरराष्ट्रीय खेऴाडू म्हणून माझा प्रवास संपलेला आहे. यापुढे मी केवऴ अर्जेंटिनाचा चाहता मैदानात उपस्थित राहणार आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाला पराभव पक्तरावा लागला. फ्रान्सने 4-3 असा विजय मिऴवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
FIFA Football World Cup 2018 : अर्जेंटिनाचा हा खेऴाडू आता प्रेक्षकाच्या भूमिकेत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 12:08 AM
आता मी केवऴ प्रेक्षकाच्या भूमिकेत दिसणार. खेऴाडू म्हणून माझा प्रवास येथेच संपत आहे, अर्जेंटिनाच्या झेव्हियर मास्केरानोने निवृत्तीची घोषणा करताना व्यक्त केलेले मत.
ठळक मुद्देअर्जेंटिनाला निवृत्तीची पहिली झऴ !