सेंट पिटर्सबर्ग - थॉमस म्युइनर आणि इडन हॅझार्डच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर बेल्जियमने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला 2-0 असे पराभूत केले. या विजयासह त्यांनी विश्वचषक स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले आणि त्यांची ही विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. 1986च्या विश्वचषक स्पर्धेतील चौथे स्थान ही बेल्जियमची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती.
- बेल्जियमचा दुसरा गोल, इडन हॅझार्डला सूर गवसला
- इंग्लंडच्या गोलरक्षक पिकफोर्डचा अप्रतिम बचाव
- त्याच्या जागी मेर्टेनेसला पाचारण केले
- 60व्या मिनिटाला बेल्जियमने रोमेलू लुकाकूला बदली केले
- पहिल्या सत्रात बेल्जियमकडे 1-0 अशी आघाडी.
- बेल्जियमचे वर्चस्व
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या तिस-या स्थानासाठीच्या सामन्यात बेल्जियमने आक्रमक खेळ करत चौथ्याच मिनिटाला गोल करून इंग्लंडवर दबाव वाढवला आहे. थॉमस म्युइनरने बेल्जियमला आघाडी मिळवून दिली. इंग्लंडचा संघ 0-1 अशा पिछाडीवर पडूनही बचावात्मक पवित्र्यात दिसतोय.