मॉस्को : सामना संपायला काही मिनिटे शिल्लक होती. दोन्ही संघ 0-0 असे बरोबरीत होते. कोस्टारिकाविरुद्ध ब्राझीलवर बरोबरी करण्याची नामुष्की ओढवणार, असे वाटत होते. ब्राझीलचे चाहते निराश झाले होते. पण फुटबॉलसारख्या खेळात कोणत्याही क्षणी गोल होऊ शकतो आणि याचा प्रत्यय या सामन्यात आला. निर्धारीत वेळेनंतर दिलेल्या सहा मिनिटांच्या भरपाई वेळेत ब्राझीलने दोन गोल कोस्टा रिकावर 2-0 असा विजय मिळवला.
निर्धारीत 90 मिनिटांच्या वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. 90 मिनिटांमध्ये ब्राझीलला बऱ्याच संधी मिळाल्या, पण त्यांना या संधीचे सोने करता आले नाही. 90 मिनिटानंतर सहा मिनिटे भरपाई वेळ देण्यात आला. या भरपाई वेळेच्या पहिल्याच मिनिटाला फिलीप कुटीन्होने ब्राझीलसाठी पहिला गोला केला. त्यानंतर भरपाई वेळेत संपायला काही सेंकदं शिल्लक असताना नेमारने ब्राझीलसाठी दुसरा गोल केला.