शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

FIFA Football World Cup 2018 : ‘युगोस्लाव्ह’चे ‘जीन्स’ जोपासणारे ‘क्रोएट्स’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 10:00 AM

रशियाची विश्वचषकातील ‘एक्झिट’ फार चर्चेत नाही. पण क्रोएशियाचा उपांत्य फेरीतील प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे.

ठळक मुद्देया स्टायलिश विजयाद्वारे क्रोएशियाने एकप्रकारे त्यांचे ‘वडील’ युगोस्लाव्हियाचाच वारसा कायम ठेवला आहे.

चिन्मय काळे : यंदाचा फुटबॉल विश्वचषक मातब्बरांना धक्का देणारा ठरतोय. या श्रेणीत आक्रमक रशियाला त्यांच्याच भूमीत जाऊन शांत खेळाने पराभूत करुन क्रोएशियाने फुटबॉल जगताला धक्का दिला. या सामन्यात रशियाची विश्वचषकातील ‘एक्झिट’ फार चर्चेत नाही. पण क्रोएशियाचा उपांत्य फेरीतील प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे. या स्टायलिश विजयाद्वारे क्रोएशियाने एकप्रकारे त्यांचे ‘वडील’ युगोस्लाव्हियाचाच वारसा कायम ठेवला आहे.क्रोएशिया, सर्बिया, हंगेरी, बल्गेरिया, आॅस्ट्रीया हे मुळात सर्व बाल्कन प्रदेश. दुसऱ्या महायुद्धापासून सातत्याने धुमसत असणाऱ्या या क्षेत्रात फुटबॉलचे भारी वेड. यापैकी क्रोएशिया, सर्बियायासारखे देश मूळ युगोस्लाव्हियाचा भाग. हा युगोस्लाव्हिया क्रोएशियासह अन्य पाचही देशांचा वडील. विघटनापर्यंत युगोस्लाव्हियाची फुटबॉल विश्वचषकातील कामगिरी चांगलीच राहिली आहे. हा संघ विश्वचषकात कधीच साखळीतून परतलेला नाही. किमान उप उपांत्यपूर्व फेरीपर्यंत गेला आहे. तर १७ वर्षाखालील विश्वचषकाचा युगोस्लाव्हिया दोन वेळा विजेता राहीला आहे.

१९९५ मध्ये युगोस्लाव्हियाचे विघटन झाले. सहा देश वेगळे झाले. त्यावेळी त्यांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघात २५ टक्के खेळाडू क्रोएट्स होते. त्यापैकीच एक डेव्हॉर सूकर याने १९९८ मध्ये पहिल्याच स्पर्धेत संघाला उपांत्य फेरीत नेले व स्वत: सर्वाधिक गोल केले. मुख्य म्हणजे हे डेव्हॉर सूकर सध्या क्रोएशियन फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. विघटनानंतर देशाचे सहा भाग झाले तरी ‘वडील’ युगोस्लाव्हियाकडून फुटबॉलचे गुण व वारसा सर्वाधिक क्रोएशियानेच आत्मसाद केले. त्याचेच निकाल रशियाविरुद्धच्या सामन्यात दिसले.

सर्वसामान्य फुटबॉल चाहत्यांमध्ये रशिया असो वा क्रोएशिया या दोघांकडून अशा दमदार खेळाची अपेक्षा नव्हती. पण फुटबॉलकडे तंत्रशुद्ध दृष्टीने पाहणारे तज्ज्ञ सुरूवातीपासूनच क्रोएशियाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा बाळगून होते. रशियाने तर केवळ यजमानपदाचा लाभ घेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. त्याचआधारे त्यांच्या संघाने क्रोएशिया विरुद्धच्या लढतीत मनोबल वाढविणाऱ्या प्रेक्षकांच्या पाठींब्यावर आक्रमक खेळ केला. पण क्रोएशियाने तेवढ्याच शांतपणे सामना आक्रमक न होऊ देता रशियालासुद्धा संतुलित खेळासाठी बाध्य केले. एरवी अशाप्रकारचा खेळ जर्मनीकडून केला जातो. क्रोएशिया त्याच युरोपातील. दुसऱ्या महायुद्धात जर्मन आक्रमणाच्या झळा क्रोएट्स नागरिकांनीही सोसल्या होत्याच. कदाचित या सर्वांचे मिश्रण त्यांच्यातील फुटबॉल तंत्रात दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल जगतात आज जर्मनी, इटली, स्पेन, नेदरलॅण्ड्ससारख्या संघांना फाइट देण्याची हिंमत जशी ब्राझील, अर्जेंटीना, उरुग्वे हे देशच दाखवतात. तशी १९५४ ते १९९० या काळात फुटबॉलमधील तेव्हाच्या दमदार संघांना लढा देण्याची हिंमत युगोस्लाव्हियाचा संघ दाखवत होता. त्याच युगोस्लाव्हियाच्या ‘जीन्स’ चा तंतोतंत वारसा कोणी उचलला असेल तर ते क्रोएट्स अर्थात क्रोएशिया आहे. यंदा तर त्यांची कामगिरी युगोस्लाव्हियापेक्षाही सरस होण्याची चिन्हे दिसत आहेत, हे नक्की.

स्वातंत्र्याचे मोल जाणून आहेतक्रोएशिया देशाची निर्मिती हाल-अपेष्टा सहन करुन झाली. स्वत:चे वेगळे अस्तित्त्व असतानाही सर्बियाकडून सातत्याने या देशाला अन्याय सहन करावा लागला. त्यातून स्वातंत्र्य मिळाल्याचे मोल माहित असल्याने त्यांच्या राष्ट्राध्यक्षा कोलिंदा ग्रॅबर कितारोव्हिच यांनी या ‘व्हीआयपी’ कक्षा सोडून आपल्या देशाच्या नागरिकांमध्ये जाऊन बसल्या. स्वभावातील हा साधेपणा क्रोएशियाच्या संघातील खेळाडूंकडून मैदानावरही दिसला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Croatiaक्रोएशियाrussiaरशियाFootballफुटबॉल