मॉस्को : इंग्लंड आणि बेल्जियम हे दोन्ही देश बाद फेरीत पोहोचले असले तरी ' जी ' गटातील अव्वल स्थान राखण्यासाठी त्यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळाली. कारण विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंड आणि बेल्जियम यांनी जोरदार आक्रमणे लगावली. पण पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात मात्र अपयश आले. त्यामुळे पहिल्या सत्रात हा सामना गोलशून्य बरोबरीत होता.
इंग्लंडच्या संघाने या सामन्यासाठी संघात आठ बदल केले होते. सर्व खेळाडूंना विश्वचषकात खेळण्याची संधी मिळावी आणि बाद फेरीत ते नवख्या खेळाडूसारखे खेळू नयेत, ही गोष्टीमागची रणनीती होती. या रणनीतीमुळे इंग्लंडच्या खेळातील बदलही पाहायला मिळाला. त्यामुळेच त्यांच्याकडून चांगले आक्रमण आणि अभेद्य बचाव पाहायला मिळाला.