समारा : ब्राझीलचा संघ आक्रमणासाठी ओळखला जातो. पण फुटबॉल विश्वचषकातील उपउपांत्यपूर्व मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या सत्रात ब्राझीलचा खेळ थंडा, थंडा... कूल, कूल असाच राहिला. दोन्ही संघांना पहिल्या सत्रात एकही गोल करता आला नाही, त्यामुळे पहिले सत्र ०-० असे बरोबरीत होते.
ब्राझीलला मेक्सिकोच्या संघाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्या सत्रात बचाव करण्यावर अधिक भर दिला. मेक्सिकोच्या संघाने सामन्यात चांगले आक्रमण लगावले, पण त्यांना एकही फटका गोलजाळ्याजवळ मारता नाही आला. कारण ब्राझीलने या सामन्यातील पहिल्या सत्रात अभेद्द बचाव केला. ब्राझीलने तीनवेळा मेक्सिकोच्या गोलजाळ्यावर आक्रमण केले, पण मेक्सिकोचा गोलरक्षक ग्युलेर्मो ओचोआने चांगला बचाव केला. दुसऱ्या सत्रात जर ब्राझीलला गोल करून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना ओचोआचा बचाव भेदणे क्रमप्राप्त असेल.