व्होलग्रोगॅड - जपानला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात पोलंडकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सेनेगल आणि जपान यांच्यापैकी बाद फेरीत कोणाचे तिकीट पक्के होइल याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, फेअर प्ले मुळे जपानला बाद फेरीत प्रवेश करता आला. जॅन बेडनारेक ५९ व्या मिनिटाला गोल करून पोलंडला विजय मिळवून दिला.
जपानने ३ सामन्यांत केवळ २८ फाऊल्स केले. अन्य संघांच्या तुलनेत ही संख्या फारच कमी होती. तीन सामन्यांत त्यांना ४ पिवळे कार्ड मिळाले. याउलट सेनेगलला ६ पिवळे कार्ड मिळाले. पोलंडविरूध्दच्या लढतीत त्यांना आणखी दोन पिवळे कार्ड दाखवण्यात आले असते तर त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले असते. पण त्यांच्या फेअर प्लेने त्यांना बाद फेरीत प्रवेश मिळवून दिला.
जपान आणि पोलंड यांच्यातील ह गटातील अखेरच्या सामन्यात पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरी राहिली. स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलेल्या पोलंडने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. कामिल ग्रोसिस्कीने हेडरद्वारे केलेला प्रयत्न जपानचा गोलरक्षक इजी कावाशिमाने सुरेख अडवला. त्यामुळे पोलंडला आघाडी घेता आली नाही. जपानकडूनही बरेच प्रयत्न झाले, परंतु त्यांचीही गोलपाटी रिकामी राहिली. फेअर प्ले नियमावर बाद फेरीत प्रवेश करणारा जपान हा पहिलाच संघ ठरला आहे.