मॉस्को : फुटबॉल चाहत्यांना विश्वचषकात सर्वात जास्त अपेक्षा आहेत त्या ब्राझीलच्या नेमारकडून. पहिल्या सामन्यात नेमारला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर तो जायबंदीही झाला होता. पण तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. त्यामुळे कोस्टारिकाबरोबर होणाऱ्या सामन्यात नेमारची जादू चालणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
ब्राझील आणि कोस्टारिका यांच्यातील सामन्यासंदर्भातील हा व्हीडीओ
नेमारला पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही, कारण प्रतिस्पर्धी संघाने त्याला चांगलेच घेरले होते. या सामन्यात त्याला तब्बल आठ वेळा मैदानात पाडले होते. त्यामुळे नेमार पुन्हा एकदा दुखापतग्रस्त होणार आणि अन्य सामन्यांना मुकणार, असे वाटत होते. पण गुरुवारी ब्राझीलच्या सरावामध्ये नेमार दिसला आणि त्याच्या चाहत्यांना हायसे वाटले.
ब्राझील-कोस्टारिका लढतीतील दोन्ही संघ
ब्राझीलला पहिल्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागली होती. त्यामुळे या सामन्यात ब्राझीलकडून विजयाची अपेक्षा असेल. कारण त्यांना जर बाद फेरीत स्थान पटकावायचे असेल तर त्यांना या सामन्यात विजय मिळवावा लागेल.
अशी असेल दोन्ही संघांची रणनीती