मॉस्को : फुटबॉल विश्वचषकातील जपान आणि सेनेगल यांच्यातील सामन्याचे पहिले सत्र 1-1 असे बरोबरीत सुटले. सेनेगलने सामन्याच्या अकराव्या मिनिटालाच गोल केला होता. पण जपाननेही हार मानली नाही. त्यांना सामन्याच्या 34व्या मिनिटाला गोल करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.
सामन्याच्या सुरुवातीपासून सेनेगलने चांगले आक्रमण केले. पण त्यांना हा पहिला गोल करता आला तो जपानच्या बचावपटूच्या चुकीमुळेच. कारण चेंडू जपानच्या गोलपोस्टजवळ होता, तरीही त्यांच्या बचावपटूने चेंडू दूर भिरकावला नाही. त्याची ही चुक सेनेगलच्या पथ्यावर पडली आणि सेनेगलाच्या सादिओ मानेने पहिला गोल केला.
पहिला गोल झाल्यावर सेनेगलने आक्रमक खेळ करण्यावर भर दिला. या गोष्टीचाच फायदा यावेळी जपानने घेतला. जपानच्या ताकाशी इनुइने अप्रतिम गोल करत जपानला सामन्यात 1-1 अशी बरोबरी करून दिली.