मॉस्को - यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या पेनल्टी शूटआऊट लढतीत यजमान रशियाने 4-3 (1-1) अशा फरकाने माजी विजेत्या स्पेनवर विजय मिळवला. पहिल्या सत्राचा खेळ वगळता संपूर्ण लढतीत रटाळ खेळ झाला. दोन्ही संघानी बचावात्मक खेळावरच भर दिला होता. कोके आणि आयगो अस्पास यांचे पेनल्टी शूटआऊट वरील प्रयत्न रशियाच्या गोलीने अप्रतिमरित्या रोखून माजीविजेत्या स्पेनला स्पर्धेबाहेर केले.
ॲर्टेम डियूबाने ४१ व्या मिनिटाला गोल करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत यजमान रशियाला पहिल्या सत्रात स्पेनविरुद्ध १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. सेर्गेई इग्नाशेव्हीचच्या स्वयंगोलच्या जोरावर स्पेनने खाते उघडले, मात्र त्यांना 1-0 अशी आघाडी कायम राखता आली नाही. डियूबाने पेनल्टी स्पॉट किकवर बरोबरीचा गोल केला.