मॉस्को : निर्णायक लढतीत दमदार खेळत करत अखेर स्वीडनने बाद फेरीत मजल मारली. फुटबॉल विश्वचषकाच्या करो या मरो सामन्यात स्वीडनने मेक्सिकोवर 3-0 असा दणदणीत विजय मिळवला आणि अव्वल स्थानासह बाद फेरीत प्रवेशही निश्चित केला.
मध्यंतरानंतर पाचव्याच मिनिटाला ऑगस्टीन्सनने स्वीडनसाठी पहिला गोल केला. या गोलनंतर स्वीडनचा आत्मविश्वास दुणावला. सामन्याच्या 62व्या मिनिटाला स्वीडनला स्पॉट किक मिळाली आणि या संधीचा फायदा स्वीडनने उचलला. स्वीडनच्या ग्रनक्विस्टने पेनेल्टीवर गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्याच्या 74व्या मिनिटाला मेक्सिकोच्या अल्वारेझने स्वत:च्या गोलजाळ्यात चेंडू मारला आणि स्वीडनला तिसारा गोल आंदण मिळाला.
फिफा विश्वचषक स्पर्धेतील एफ गटात मेक्सिको आणि स्वीडन यांच्यातील लढत मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत होते. दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध अनेक आक्रमणे केली. मात्र खेळाच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोक करण्यात अपयश आले. खेळाच्या सुरुवातीलाच स्विडनला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. मात्र त्यांना गोल करता आला नाही. दुसरीकडे गटात अव्वल असलेल्या मेक्सिकोच्या संघालाही आघाडी मिळवण्यात अपयश आले. दरम्यान 31 व्या मिनिटाला स्विडनच्या खेळाडूंनी केलेले आक्रमण मेक्सिकोचा गोलरक्षक ओचोआ याने थोपवले. अखेर मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत राहिले.