सारांक्स : ट्युनिशियाचे फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील आव्हान पनामाविरुद्धच्या लढतीपूर्वीच संपुष्टात आले होते. पण विश्वचषकाच्या बाहेर पडूनही ट्युनिशियाने एक इतिहास रचला आहे. ट्युनिशियाने पनामावर 2-1 असा विजय मिळवत विश्वचषकाचा शेवट गोड केला.
आतापर्यंत ट्युनिशियाला विश्वचषकात गेल्या 40 वर्षांत एकही गोल करता आला नव्हता, पण 40 वर्षांनंतर त्यांनी पहिल्यांदा यावेळी गोल केला. यापूर्वी ट्युनिशियाने 1978 साली झालेल्या विश्वचषकात विजय मिळवला होता, त्यानंतर त्यांचा हा पहिलाच विजय आहे.
यासीन मेरिहाच्या स्वयंगोलमुळे ट्युनिशिया विरूध्द पहिल्या सत्रात पनामाला १-० अशी आघाडी घेता आली. दुसऱ्या सत्रात ट्युनिशियाने अधिक आक्रमक खेळ केला आणि आपली चुक भरून काढली. सामन्याच्या 51व्या मिनिटाला बेन युसूफने ट्युनिशियासाठी पहिला गोल केला. त्यानंतर सामन्याच्या 66व्या मिनिटाला ट्युनिशियाच्या खाजरीने गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.