मॉस्को - रशियात सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल सामन्यात रविवारी गोलरक्षक डॅनिजेल सुबासिचने पेनल्टी शूटआऊटमध्ये रंगलेल्या थरारक सामन्यात तीन अप्रतिम बचाव करून क्रोएशियाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिऴवून दिला. क्रोएशियाने 3-2 ( 1-1) अशा फरकाने डेन्मार्कचे कडवे आव्हान परतवून लावले. 1998 नंतर क्रोएशियाची विश्वचषक स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. फ्रान्समध्ये झालेल्या त्या स्पर्धेत पदार्पणात उपांत्य फेरीत प्रवेश केला होता आणि त्यापेक्षा सरस कामगिरी करण्याचे लक्ष्य त्यांना खुणवत आहे. त्यांच्या मार्गात यजमान रशियाचे आव्हान असणार आहे.
मात्र रविवारी सुबासिचची ही कामगिरी इतिहासाला उजाळा देणारी ठरली. पेनल्टी शूटआऊटमध्ये सुबासिचने डेन्मार्कच्या तीन खेळाडूंचे प्रयत्न अपयशी ठरवले. 1 जुलै 2006 मध्ये अशाच एका संघासाठी गोलरक्षक हिरो ठरला होता आणि बरोबर 12 वर्षांनी त्याच दिवशी त्या कामगिरीची पुनरावृत्ती झाली. असे काय घडले होते ते जाणून घेऊया...