गुवाहाटी/ कोलकाता : १७ वर्षे आतील विश्वचषकात साखळी फेरीत फ्रान्सने होंडुरासचा ५-१ ने तर इंग्लंडने इराकचा ४-० ने धुव्वा उडवित उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. या विजयासह फ्रान्सने ग्रुप ई मध्ये तर इंग्लंडने ग्रुप एफमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.शनिवारी गुवाहाटीतील इंदिरा गांधी नॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात होंडुरासच्या कार्लोस माजिया याने दहाव्या मिनिटालाच गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चार मिनिटांनी फ्रान्सच्या विल्सन इसिडोर याने गोल केला. अलेक्स फिलीप याने २३ व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये फ्रान्सने २ -१ अशी आघाडी घेतली. दुसºया हाफवर फ्रान्सचेच नियंत्रण राहिले. फिलीप याने ६४ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. दुसºया हाफमध्ये फ्रान्सच्या अमिने गोयुरी ८६ व्या मिनिटाला तर यासिने अदली याने ९०व्या मिनिटाला गोल केला. अदिले याने अतिरिक्त वेळेत ६ व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. तीन सामन्यात पाच गोल करणारा गोयुरी या स्पर्धेतील सर्वात जास्त गोल करणारा खेळाडू आहे. पराभवानंतरदेखील होंडुरासचा संघ बाद फेरीत पोहचण्यात यशस्वी ठरला. सहा ग्रुपमध्ये तिसºया स्थानावर राहणाºया चार सर्वोत्तम संघांना बाद फेरीत प्रवेश मिळतो. त्यात होंडुरास एक आहे. होंडुरासचे तीन गुण आहे. फ्रान्सचा सामना ग्रुप डीमध्ये दुसºया स्थानावरील स्पेनवर राहणार आहे.तर दुसरीकडे कोलकात्यातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर झालेल्या सामन्यात इंग्लंडने इराकवर वर्चस्व गाजवले. इंग्लंडच्या एंजेल गोम्स, एमिली स्मिथ रोवे आणि डॅनियल लोडर यांनी गोल केले. इराकचा संघ गोल करण्याच्या फारशा संधी निर्माण करू शकला नाही. या पराभवानंतरही इराकने अंतिम १६ मध्ये स्थान पटकावले आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना मालीसोबत होईल. (वृत्तसंस्था)
FIFA U-17 World Cup : फ्रान्स, इंग्लंडचा विजय; दोन्ही संघ आपापल्यागटात अव्वल स्थानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 3:46 AM