कोलकाता/ गुवाहाटी : पूर्व आशियातील ‘पॉवर हाऊस’ जपान संघाला शनिवारी न्यू कॅलेडोनिया संघाविरुद्ध १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले. तसेच मेक्सिकोनेही चिलीला गोलरहीत बरोबरीवर रोखले, असे असले तरी जपान आणि मेक्सिको या दोन्ही संघांनी १७ वर्षे आतील विश्वकप फुटबॉल स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.कोलकात्यात झालेल्या या सामन्यात केता नाकामुराने न्यू कॅलेडोनियाचा बचाव भेदक जपानला सातव्या मिनिटाला खाते उघडून दिले. तीन सामन्यांतील हा त्याचा चौथा गोल आहे.जपानसाठी अंडर-१७ विश्वकपमध्ये पदार्पण करणारा संघ न्यू कॅलेडोनियाविरुद्धची लढत सोपी होती, पण दुसºया हाफमध्ये न्यू कॅलेडोनियाने काही चांगल्या चाली रचल्या. ८३ व्या मिनिटाला कर्णधार जेकब जेनोने कॅलेडोनिया संघाला बरोबरी साधून दिली आणि अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत प्रथमच सहभागी होणारा संघ इतिहास नोंदविण्यात यशस्वी ठरला. न्यू कॅलेडोनियासाठी हा दुसरा अंडर-१७ विश्वकप गोल होता. यापूर्वी सिदरी वाडेंजेसने फ्रान्सविरुद्ध १-७ ने झालेल्या पराभवात स्पर्धेत पहिला गोल नोंदविला होता.या अनिर्णित निकालानंतरही जपानचा संघ मेक्सिकोत २०१३ मध्ये झालेल्या स्पर्धेनंतर प्रथमच प्री क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. जपानचा हा आठवा अंडर-१७ विश्वकप आहे. जपान ‘ई’ गटात चार गुणांसह दुसºया स्थानी आहे. फ्रान्स ९ गुणांसह अव्वल स्थानी आहे. १७ आॅक्टोबरला राऊंड १६ च्या लढतीत जपानला या स्टेडियममध्ये ‘एफ’ गटातील विजेत्या संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. न्यू कॅलेडोनिया संघाला दोन सामन्यांत १२ गोल स्वीकारावे लागले.दुसरीकडे मेक्सिकोने ग्रुप एफच्या अखेरच्या सामन्यात चिलीला गोलरहित बरोबरीत रोखले. मेक्सिकोच्या संघाने एकही सामना न जिंकता या स्पर्धेची बाद फेरी गाठली आहे. तर चिली या स्पर्धेतून आधीच बाहेर पडला आहे.मेक्सिकोने पहिल्या सामन्यात इराकसोबत १ -१ अशी बरोबरी साधली होती. तर दुसºया सामन्यात इंग्लंडकडून ३-२ असा पराभव पत्करला होता. त्यानंतर अखेरच्या सामन्यात चिलीसोबत बरोबरी साधली. मेक्सिकोचे तीन गुण आहेत. तर इंग्लंड आणि इराकनंतर ग्रुप एफमधून बाद फेरी गाठणारा हा तिसरा संघ ठरला.(वृत्तसंस्था)
FIFA U-17 World Cup : जपान, मेक्सिकोचे सामने बरोबरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 3:43 AM