FIFA वर्ल्डकपचा फिव्हर! फक्त सामने पाहण्यासाठी 17 मुलांनी खरेदी केले 23 लाखांचे घर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 02:48 PM2022-11-21T14:48:33+5:302022-11-21T14:49:02+5:30

FIFA world cup : फिफा विश्वचषकात सहभागी झालेले 32 संघ कतारमध्ये पोहोचले आहेत.

FIFA world cup 17 kerala boys buy home of 23 lakh to watch every fifa match live | FIFA वर्ल्डकपचा फिव्हर! फक्त सामने पाहण्यासाठी 17 मुलांनी खरेदी केले 23 लाखांचे घर 

FIFA वर्ल्डकपचा फिव्हर! फक्त सामने पाहण्यासाठी 17 मुलांनी खरेदी केले 23 लाखांचे घर 

Next

फिफा विश्वचषक सुरू झाला आहे. फिफा विश्वचषकात सहभागी झालेले 32 संघ कतारमध्ये पोहोचले आहेत. तसेच, फिफा विश्वचषकाचा आनंद घेण्यासाठी जगातील दहा लाखांपेक्षा जास्त फुटबॉलप्रेमी कतारमध्ये येण्याची शक्यता आहे. भारतातही फूटबॉल चाहत्यांची कमी नाही. दरम्यान, फिफा विश्वचषकाची क्रेझ केरळमध्ये पाहायला मिळत आहे. येथील मुलांच्या एका ग्रुपने फिफा विश्वचषकातील सामने पाहण्यासाठी जवळपास 23 लाख रुपयांचे घर खरेदी केले आहेत.

दरम्यान, जगभरातील प्रेक्षक फिफा विश्वचषक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. याच पार्श्वभूमीवर केरळमधून हे प्रकरण समोर आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही मुलांनी खरेदी केलेल्या घराचे फोटो शेअर केले आहेत. या मुलांना पाहून सगळेच किती उत्साहात आहेत, असे वाटते. केरळमधील कोची येथील मुंडक्कमुगल गावातील 17 मुलांनी हा पराक्रम केल्याचे सांगण्यात आले. एकत्र बसून निवांतपणे सामना लाइव्ह पाहता यावा म्हणून त्यांनी हे सर्व केले.

मिळालेल्या माहितीनुसार, या घरात 32 संघांचे झेंडेही लावण्यात आले आहेत. यासोबतच मेस्सी आणि रोनाल्डोसारख्या खेळाडूंचे मोठे पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. यानंतर या घरात सगळ्यांना एकत्र सामना पाहता यावा यासाठी या घरात मोठ्या स्क्रीनचा टेलिव्हिजन लावण्यात आला आहे. या घराच्या खरेदीदारांपैकी एका मुलाने एएनआयला सांगितले की, फिफासाठी काहीतरी खास करण्याची योजना आखली होती आणि ती प्रत्यक्षात आणली आहे.

येथे कोणीही सामना पाहू शकतो
याचबरोबर, फुटबॉल विश्व पाहण्याची ही परंपरा आमचे लोक अनेक वर्षांपासून करत आहेत, मात्र यावेळी आम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आणि हे घर विकत घेतले. आम्ही 17 जणांनी मिळून 23 लाख रुपयांना घर घेतले. येथे कोणीही येऊन सामना पाहू शकतो. कोणावरही बंधन नाही आणि भविष्यातही ही परंपरा कायम राहावी अशी आमची इच्छा आहे, असे संबंधित मुलाने सांगितले. 

यजमान कतारचा पहिल्याच सामन्यात पराभव; इक्वेडोर फुटबॉल सामना जिंकला
उद्घाटनानंतर पहिलाच सामना यजमान कतार आणि इक्वेडोरमध्ये खेळविण्यात आला. हा सामना इक्वेडोरने 2-0 जिंकला असून कतारचा दारुण पराभव झाला आहे. एनर व्हलेनसियाच्या दोन गोल नोंदविले. याच गोलच्या जोरावर इक्वेडोरने 2-0 अशा फरकाने यजमान कतारवर विजय मिळवला. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात यजमान प्रथमच हरले. यापूर्वी वर्ल्ड कपच्या 22 लढतीत एकाही यजमानांना हार मानावी लागली नव्हती. यापूर्वीच्या 21 वर्ल्ड कप स्पर्धेत 20 वेळा यजमान देशाने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. यजमानपद मिळवताना प्रथमच खेळणारा कतार हा तिसरा देश ठरला. यापूर्वी उरुग्वे ( 1930) व इटली (1934) यांनी यजमानपद भूषवण्यासोबतच प्रथमच वर्ल्ड कप खेळला होता.

Web Title: FIFA world cup 17 kerala boys buy home of 23 lakh to watch every fifa match live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.