मॉस्को : रशियामध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकामध्ये आतापर्यंत कुणी किती गोल केले, कुणाला कसे धक्के बसले, हे आपण ऐकत आलो आहोत. पण मंगळवारच्या सामन्यात या विश्वचषकातली अशीच एक पहिली-वहिली गोष्ट घडली आणि ती गोष्ट म्हणजे लाल कार्ड. यंदाच्या विश्वचषकात पहिले लाल कार्ड मिळाले आहे ते कोलंबिया या देशाला. जपानविरुद्धच्या सामन्यात कोलंबियाचा कोर्लोस सांचेझला पहिले लाल कार्ड मिळाले.
सामन्याच्या तिसऱ्या मिनिटालाच जपानने कोलंबियाव जोरदार आक्रमण लगावले. जपानचा संघ कोलंबियाच्या गोलपोस्टजवळ दाखल झाला होता. जपानच्या कागावाने यावेळी कोलंबियाच्या गोलपोस्टवर चेंडू मारला. कोलंबिलाच्या गोलपोस्टसमोरच सांचेज उभा होता. त्यावेळी कागावाने मारलेला चेंडू हा सांचेझच्या हाताला लागला. त्यामुळे पंचांनी थेड सांचेझला लाल कार्ड दाखवले.
सांचेझला लाल कार्ड दाखवल्यावर हे प्रकरण थांबले नाही. पंचांनी नियमांप्रमाणे जपानला स्पॉक किक दिली. कागावे ही स्पॉट किक घेतली आणि सामन्याच्या सहाव्या मिनिटाला जपानला पहिला गोल करता आला. या गोलमुळे कोलंबिया एक गोल आणि एका खेळाडूने पिछाडीवर गेला. कारण लाल कार्ड दाखवल्यामुळे कोलंबियाला यापुढील सामन्यात एका खेळाडूची उणीव जाणवणार, हे मात्र नक्की.